अखेर हत्येतील आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:14 AM2018-08-25T00:14:45+5:302018-08-25T00:16:13+5:30

तालुक्यातील गव्हा (कोल्ही) येथील हत्येच्या घटनेतील आरोपी आठ दिवसांपासून पोलिसांना हुलकावनी देत होता. अखेर पोलिसांनी आज त्याला अटक करण्यात यश मिळविले आहे.

The accused then finally arrested | अखेर हत्येतील आरोपीला अटक

अखेर हत्येतील आरोपीला अटक

Next
ठळक मुद्देआठ दिवसानंतर पोलिसांना आले यश

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : तालुक्यातील गव्हा (कोल्ही) येथील हत्येच्या घटनेतील आरोपी आठ दिवसांपासून पोलिसांना हुलकावनी देत होता. अखेर पोलिसांनी आज त्याला अटक करण्यात यश मिळविले आहे.
देवेंद्र उर्फ देवा मोहनलाल साहू (४६) रा. लेबर कॉलणी हिंगणघाट, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. १९ आॅगस्टला गव्हा (कोल्ही) येथील नरेद्र भगत यांच्या शेतातील विहिरीत संतोष सुखदेव अंबादे याचा मृतदेह आढळून आला होता. मृतकाच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर असलेल्या मारावरून हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. तपासादरम्यान मृतक आणि देवा हे दोघेही पारधी बेड्यावरील फुलझेले नामक दारुविक्रेत्याला दारु आणून देण्याचे काम करीत होते. यातूनच या दोघांमध्ये वाद होऊन हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी देवाचा शोध सुरु केला. या घेटनेनंतर दुसºया दिवशी सकाळी ६ वाजतादरम्यान आरोपी देवा हा रेल्वेने वरोरा येथे निघून गेला.काही दिवस त्याने वेंडरचे काम केल्याने त्याला रेल्वेबाबत पुर्ण माहिती होती.त्यामुळे तो रेल्वेनेच आठ दिवस फिरत राहिला. शेवटी त्याच्या जवळचे पैसे संपल्यामुळे तो हिंगणघाटला परत आला.माहिती मिळताच ठाणेदार प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी अरविंद येनुरकर, धमेन्द्र तोमर यांनी देवाला अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भिमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रविण मुंडे, मिलिद पारडकर, अशोक चहादे, नामदेव चाफले, सचिन रोकडे, स्वप्नील वाटकर,अजय घुसे, अमोल खाडे, वैभव चरडे, अजय वानखेडे, राजु जयसिंगपुरे करीत आहे.

Web Title: The accused then finally arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस