शहरात २९७ वाहन धारकांवर कारवाई
By admin | Published: June 25, 2017 12:43 AM2017-06-25T00:43:16+5:302017-06-25T00:43:16+5:30
वाहतूक पोलीस शाखेच्यावतीने शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचे प्रयत्न केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वाहतूक पोलीस शाखेच्यावतीने शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचे प्रयत्न केले जात आहे. पोलीस निरीक्षक बदलताच या कारवाईला वेग आल्याचे दिसून आले. गुरूवारी डॉ. आंबेडकर व बजाज चौकात तथा शुक्रवारी शहरात अन्यत्र मोहीम राबविण्यात आली. २९७ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.
गुरूवारी चुकीच्या दिशेने वाहने चालविणाऱ्या १४८ तर नो पार्किंगमध्ये वाहने पार्क करणाऱ्या ५५ वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली. शुक्रवारी एकूण ९४ वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलीस शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून मुंबई येथील दत्तात्रय गुरव यांनी सूत्रे स्वीकारली. कार्यभार स्वीकारताच त्यांनी वाहतुकीला शिस्त लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गुरूवारी डॉ. आंबेडकर व बजाज चौकात विशेष मोहीम राबविली. यात चुकीच्या बाजूने वाहने चालविणाऱ्या १४८ धारकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. यात एक आॅटो व चार कारचा समावेश होता. शिवाय बाजार परिसरातील नो-पार्किंगमध्ये वाहने उभ्या करणाऱ्या ५५ वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली. यात सर्व दुचाकी धारकांचा समावेश आहे. शुक्रवारीही शहरात ९४ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
काही वर्षांपूर्वी बाजारपेठेत पार्किंगची पी-वन, पी-टू ही सिस्टीम लागू करण्यात आली होती. यात काही दिवस रस्त्याच्या एका बाजूने तर काही दिवस रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने वाहने उभी करावी, अशा सूचना होत्या. ही पद्धत गुरव यांनी पुन्हा अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.