व्यसनाधीन पिढी देशासाठी घातकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 11:56 PM2018-05-25T23:56:07+5:302018-05-25T23:56:07+5:30

आजचा तरुण उद्याच्या प्रगत भारताचे भविष्य आहे. तरुण सध्या विविध व्यसनाकडे वळताना दिसतात. ही चिंतेची बाब आहे. भावी पिढी व्यसनाधीन होऊ नये, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. तसेच घरातील मोठ्या व वयोवृद्ध व्यक्तींनी आपल्याला असलेल्या व्यसनाचा त्याग केला पाहिजे.

Addictive generations are dangerous for the country | व्यसनाधीन पिढी देशासाठी घातकच

व्यसनाधीन पिढी देशासाठी घातकच

googlenewsNext
ठळक मुद्देसत्यपाल महाराज : पढेगाव येथे प्रबोधनात्मक कार्यक्रम, ७० ज्येष्ठांना केले सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : आजचा तरुण उद्याच्या प्रगत भारताचे भविष्य आहे. तरुण सध्या विविध व्यसनाकडे वळताना दिसतात. ही चिंतेची बाब आहे. भावी पिढी व्यसनाधीन होऊ नये, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. तसेच घरातील मोठ्या व वयोवृद्ध व्यक्तींनी आपल्याला असलेल्या व्यसनाचा त्याग केला पाहिजे. व्यसनाधीन पिढी ही देशाच्या विकासासाठी घातक आहे, असे प्रतिपादन सप्त खंजेरीवादक सत्यपाल महाराज यांनी केले.
पढेगाव येथे स्व. अंबरसाव पहाडे, स्व. अनिल कोकाटे व स्व. अक्षय बाळबुधे यांच्या स्मृतीत व नरेंद्र पहाडे अमृत महोत्सव समिती तथा ग्रामवासी पढेगाव यांच्यावतीने सप्त खंजेरीवादक तथा राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. मंचावर भास्कर इथापे, सुनीता इथापे, मंगेश विधळे, बजाईत, विनोद घोडे, श्याम शंभरकर, मोरेश्वर आंबटकर, सुरेश शेंडे, सरपंच त्रिशुला फुलझेले, तुकाराम घोडे आदी हजर होते. कार्यक्रमात ७० ज्येष्ठ नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सामुदायिक प्रार्थनेनी झाली. कर्मट व जुन्या सामाजिक तसेच राजकीय व्यवस्थेवर कडाडून टिका यावेळी सत्यपाल महाराज यांनी यावेळी केली. शिवाय त्यांनी अंधश्रद्धा, जातीवाद, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, स्त्री शिक्षण, व्यसनमुक्ती, आदी विषयांवर उपस्थितांना प्रबोधन केले. कार्यक्रमादरम्यान सत्यपाल महाराज यांच्या हस्ते अंध विद्यार्थी हर्षद चक्रधरे व शिल्पा आंबटकर यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कल्पना मकरंदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार हर्षद चक्रधरे यांनी मानले.

Web Title: Addictive generations are dangerous for the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.