महाकाय पिंपळापुढे प्रशासन हतबल
By admin | Published: May 13, 2016 02:13 AM2016-05-13T02:13:26+5:302016-05-13T02:13:26+5:30
येथील सदानंद वॉर्डातील एक महाकाय पिंपळवृक्ष आलेल्या वादळात आडवे झाले. याला आठ दिवसांचा काळ झाला तरी हे झाड तसेच आहे.
झाड रस्त्यावरच : आठ दिवसांपासून वाहतूक ठप्प
अल्लीपूर : येथील सदानंद वॉर्डातील एक महाकाय पिंपळवृक्ष आलेल्या वादळात आडवे झाले. याला आठ दिवसांचा काळ झाला तरी हे झाड तसेच आहे. त्याला येथून काढणे येथील ग्रामपंचायत प्रशासनालाही शक्य होत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे या मार्गाची वाहतूक बंद झाली आहे.
एका पिढीची साक्ष ठरलेला पिंपळवृक्ष चक्रीवादळामुळे मुळासह आडवा झाले. यामुळे या मुख्यमार्गाची वाहतुक ठप्प झाली असून अन्य मार्गाने ती वळती करण्यात आली आहे. हे झाड नारायण जोगे यांच्या घरावर पडल्याने त्यांच्या घरातील सोफा, टी.व्ही, दिवान, कपाट असे एकूण दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.
या महाकाय वृक्षाला पाहुनच कुणाची हात लावण्याची हिंमत करीत नसल्यामुळे याची विल्हेवाट कुणी लावावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. घर मालक इथे राहत नसल्याने यात कोणीही पुढाकार घेत नाही. याची माहिती वनविभागाला दिली असता त्यांनी झाड आमच्या हद्दीत येत नसल्याचे सांगितले. ही समस्या ग्रामपंचायतीची आहे. त्यांनी ती मार्गी लावावी. यामुळे समस्या कायमच आहे.(वार्ताहर)