आरोग्य सरंक्षक भिंतीवर संदेश लिहिण्याचा मुहूर्त प्रशासनाला गवसला
By admin | Published: February 2, 2017 12:50 AM2017-02-02T00:50:14+5:302017-02-02T00:50:14+5:30
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ग्रामीण जनतेपर्यंत आरोग्य विषयक संदेश पोहचविता यावे
कारंजा (घा.) : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ग्रामीण जनतेपर्यंत आरोग्य विषयक संदेश पोहचविता यावे म्हणून आरोग्ग्य संरक्षक भिंत तयार केली. याकरिता हजारो रूपये खर्च करण्यात आले. मात्र कारंजा तालुक्यात या भिंतीवर एकही संदेश छापला नव्हता. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यावर यावर संदेश लिहण्याचा मुहुर्त प्रशासनाला गवसला.
तब्बल आठ महिन्यानंतर या आरोग्य सरंक्षक भिंतीवरील फलकावर आरोग्य संदेश लिहिण्यात आल्याने नागरिकांना आता माहिती मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे. या फलकावर जि.प. आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम याची माहिती लिहण्यात आली आहे. आरोग्य विषयक सूचना या फलकावर नेहमी लिहिल्या जाव्या, अशी अपेक्षा नागरिकातून व्यक्त होत आहे. शासनाने याकरिता केलेला खर्च सार्थकी लागेल.(तालुका प्रतिनिधी)