प्रशासकीय इमारतीत पार्र्कींगचे वाभाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 10:14 PM2017-09-08T22:14:58+5:302017-09-08T22:15:30+5:30
स्थानिक सिव्हील लाईन भागातील प्रशासकीय इमारतीत विविध शासकीय कार्यालये आहेत. येथे नागरिकांना वाहन चालविण्याचा परवाना देणाºया उप प्रादेशिक परिवहन कार्यालय असून शासनाच्या ज्या यंत्रणेकडून नियमांवर बोट ठेऊन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक सिव्हील लाईन भागातील प्रशासकीय इमारतीत विविध शासकीय कार्यालये आहेत. येथे नागरिकांना वाहन चालविण्याचा परवाना देणाºया उप प्रादेशिक परिवहन कार्यालय असून शासनाच्या ज्या यंत्रणेकडून नियमांवर बोट ठेऊन वाहन चालविण्याच्या परवाना दिल्या जातो, त्याच यंत्रणेच्या कार्यालयापुढे सध्या बेशिस्तपणे वाहने उभी केल्या जात आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
प्रशासकीय इमारत परिसरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, कामगार न्यायालय, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय, जिल्हा भुमिअभिलेख कार्यालय आदी कार्यालये आहेत. तेथे विविध कामानिमित्त येणाºया नागरिकांना वाहन उभे करण्यासाठी या इमारतीच्या मागील बाजूला वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, सध्या अनेक वाहनचालक व या इमारती मधील विविध कार्यालयात कार्यरत कर्मचारी आपली वाहने इमारत परिसरात असलेल्या वाहनतळावर उभी न करता चक्क इमारत परिसरात मनमर्जीने उभी करीत आहेत. बेशिस्तपणे वाहने उभी केल्या जात असल्याच्या प्रकाराकडे संबंधीतांचे दुर्लक्ष होत असल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
बेशिस्तपणे उभ्या केल्या जाणाºया वाहनांचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच मनमर्जीने उभी केल्या जाणाºया वाहनांमुळे बहुतांश वेळी येथे वाहतुकीचा खोळंबा होतो. इतकेच नव्हे तर साधे पायी ये-जा करणाºयांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार वाहतुकीच्या नियमांवर बोट ठेऊन नागरिकांना वाहन चालविण्याचा परवाना देणाºया उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी उघड्या डोळ्यांनी प्रत्येक दिवशी बघत असले तरी बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी कुठलेही पाऊल उचलल्या जात नसल्याची चर्चा या परिसरात आहे. विविध कामानिमित्त जिल्ह्यातील गावांमधून व जिल्ह्याबाहेरून येणाºया नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता त्वरित योग्य पाऊल उचलत बेशिस्तांना शिस्त लावण्याची गरज आहे.
एटीएममधून पैसे काढणाºयांना सहन करावा लागतो त्रास
प्रशासकीय इमारत कार्यालय परिसरातील विविधा केंद्राच्या इमारतीत नागरिकांना सुविधा व्हावी या उद्देशाने एका राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएम देण्यात आले आहे. याचा वापर येथे जिल्ह्यातील गावागावांमधून येणाºयांसह विविध शासकीय कार्यालयात कार्यरत अधिकारी व कर्मचारी करतात. परंतु, एटीएमकडे जाणाºया रस्त्यावर सध्या मनमर्जीने वाहने उभी केली जात असल्याने एटीएममधून पैसे काढण्यासाठी जाणाºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विविधा केंद्राच्या परिसरात बेशिस्तपणे वाहने उभी केली जात आहेत. मनमर्जीनेच या भागात वाहने उभी केल्या जात असल्याने वाहतूक खोळंबते.
शासकीय कार्यालयाच्या खिडक्याही तुटलेल्याच
सिव्हील लाईन भागातील प्रशासकीय इमारतीत सुमारे २० शासकीय कार्यालये आहेत. सध्या या इमारतीच्या दुरूस्तीचे काम सुरू असून इमारतीमधील अनेक विविध शासकीय कार्यालयाच्या खिडक्या तुटलेल्या आहेत.
खिडक्यांच्या काचा तुटलेल्या असल्याने अनेक शासकीय कार्यालयात पावसाचे पाणी गळत असून शासकीय दस्ताऐवजाचे नुकसान होत असल्याची चर्चा या इमारतीमधील विविध शासकीय कार्यालयात कार्यरत कर्मचाºयांमध्ये आहे.