आयटीआयमध्ये प्रवेशाच्या तीन फेऱ्यांत 516 विद्यार्थ्यांना प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 05:00 AM2020-12-19T05:00:00+5:302020-12-19T05:00:17+5:30
विज्ञान शाखेनंतर आर्टस् आणि आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला . कोरोनायनामुळे प्रवेश प्रक्रियाही विलंबाने सुरु करण्यात आली. आठही तालुक्यातील शासकीय आयटीआय मधील १ हजार ४०० रिक्त जागांच्या प्रवेशाकरिता पाच फेऱ्या घेतल्या जाणार आहे. त्यापैकी तीन फेऱ्या आटोपल्या असून केवळ ३७ टक्के विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. आता दोन फेऱ्याकडे लक्ष लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शिक्षणानंतर लगेच स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, याकरिता विद्यार्थ्यांचा कल व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणाकडे वाढला आहे. पण, उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण आणि जिल्ह्यातील जागा यामुळे गेल्यावर्षी बऱ्याच आयआयटीआयमध्ये जागा शिल्लक होत्या. यावर्षीही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या असून आतापर्यंत केवळ ५१६ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहे. त्यामुळे यंदाही जागा शिल्लक राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांचा व्यवसाय शिक्षणाकडे वाढलेला पाहून आयटीआय कॅालेजच्याही संख्येत वाढ झाली. जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये ८ शासकीय तर १४ खासगी आयटीआय कॉलेज आहे. यापैकी आठ शासकीय आयटीआयमध्ये १ हजार ४०० प्रवेश क्षमता असून यात जोडारी, तारतंत्री, वीजतंत्री, कातारी, यांत्रिक मोटरगाडी, यंत्र कारागीर, आर.ए.सी., आयटीएसएम, यांत्रिक डिझल, कोपा, सुतारकाम, संधाता, नळ कारागीर, सुईंग टेक्नॉलॉली, ड्रेस मेकींग, ऑपरेटर मशीन टुल्स, इलेक्ट्रॉनीस, बेसीक कॉस्माटीक व फळेभाज्या आणि संस्करण या ट्रेडचा समावेश आहे. यावर्षी दहावीचा निकाल ९२.१० टक्के निकाल लागला असून १५ हजार १९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विज्ञान शाखेनंतर आर्टस् आणि आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला . कोरोनायनामुळे प्रवेश प्रक्रियाही विलंबाने सुरु करण्यात आली. आठही तालुक्यातील शासकीय आयटीआय मधील १ हजार ४०० रिक्त जागांच्या प्रवेशाकरिता पाच फेऱ्या घेतल्या जाणार आहे. त्यापैकी तीन फेऱ्या आटोपल्या असून केवळ ३७ टक्के विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. आता दोन फेऱ्याकडे लक्ष लागले आहेत.
तीन फेऱ्या पूर्ण, दोन बाकी
आयटीआय प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. आतापर्यंत तीन फेऱ्या पूर्ण झाल्या असून १ हजार ४०० प्रवेशांपैकी ५१६ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. १५ डिसेंबरपर्यंत या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहे. अजून दोन फेऱ्या बाकी असून उर्वरित प्रवेश निश्चित केले जाणार आहे. आयटीआयकडून विजतंत्री, जोडारी, तारंतत्री, मशिनिष्ट, कातारी, यांत्रिक डिझेल, यांत्रिक मोटरगाडी, संधाता, कोपा व सुईंग टेक्नॉलॉजी या करिता अधिकच्या व्यवसायाची मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांचा कल फिटर ट्रेडकडे
आयटीआयमध्ये जवळपास पंधरा ट्रेड असून यात सर्वाधिक कल जाेडारी (फिटर) या ट्रेडकडे आहे. त्यानंतर विजतंत्री व तारतंत्रीला प्राध्यान्य दिले आहे. आतापर्यंतच्या तीन फेऱ्यामध्ये या तीन ट्रेडलाच जास्त प्रवेश झाल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर संधाता, वीजतंत्री या ट्रेडला जास्त प्रवेश झाले आहेत.
जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था १५ ऑक्टोंबर पासून सुरु झाली. कोविडमुळे प्रवेश क्षमतेच्या ५० टक्के विद्यार्थ्यांना एक दिवसाआड प्रशिक्षण दिले जात आहे. जिल्ह्यात एकूण प्रवेश क्षमतेच्या ३७ टक्के प्रवेश झाले असून दोन फेऱ्या बाकी आहे.
प्रदीप घुले,
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण अधिकारी.