भेसळयुक्त खाद्य तेल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 10:12 PM2018-11-04T22:12:36+5:302018-11-04T22:13:53+5:30

गोपनिय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत मालवाहू वाहनाने भेसळयुक्त खाद्य तेल वितरित करणाऱ्यांचा भंडा फोड करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली असून पुरवठा होत असलेल्या १ लाख ४३ हजार १६० रुपये किंमतीचे संशयी भेसळयुक्त रिफार्इंड सोयाबीन खाद्य तेल जप्त करण्यात आले आहे.

Adulterated edible oil seized | भेसळयुक्त खाद्य तेल जप्त

भेसळयुक्त खाद्य तेल जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गोपनिय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत मालवाहू वाहनाने भेसळयुक्त खाद्य तेल वितरित करणाऱ्यांचा भंडा फोड करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली असून पुरवठा होत असलेल्या १ लाख ४३ हजार १६० रुपये किंमतीचे संशयी भेसळयुक्त रिफार्इंड सोयाबीन खाद्य तेल जप्त करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन वर्धाचे अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे व त्यांचे सहकारी आर्वी शहरात दिवाळीनिमित्त खाद्यपदार्थांची तपासणी करण्यासाठी तसेच नमुने घेण्यासाठी गेले असता त्यांना भेसळयुक्त खाद्य तेलाची खात्रिदायक माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे आर्वी भागातील नेहरू मार्केट परिसरात उभ्या अलेल्या एका मालवाहूतील खाद्य तेलाची तपासणी करण्यात आली. सदर गाडीची तपासणी केली असता सदर गाडीला अन्न व औषध प्रशासनाद्वारे अन्न पदार्थ वितरणाकरिता आवश्यक असणारा परवाना आढळून आला नाही. तसेच गाडीचा चालक घनश्याम सेलूकर याच्याकडे अन्न पदार्थचे खरेदी अथवा विक्री बिल उपलब्ध नव्हते.
शिवाय गाडीतील खाद्य तेलाची तपासणी केली असता रिफार्इंड सोयाबीन तेल (जेनी गोल्ड ब्रॅन्ड) १५ लिटरचे २५ टिन, रिफार्इंड सोयाबीन तेल (मदर चॉईस ब्रॅन्ड) १५ लिटरचे ५० टिन, रिफार्इंड सोयाबीन तेल (टोटल केअर ब्रॅन्ड), ५ लिटरचे ४० कॅन, रिफार्इंड सोयाबीन तेल (मदर प्राईड ब्रॅन्ड) १ लिटरचे २४० पॅकेट आढळून आले. त्याची किंमत १ लाख ४३ हजार १६० इतकी आहे. सदर भेसळयुक्त खाद्य तेल अधिकाºयांकडून जप्त करण्यात आले आहे.

खाद्य तेल उत्पादक अमरावतीचे
मदर चॉईस ब्रॅन्ड व जेनी गोल्ड ब्रॅन्डचे १५ लिटरचे टिनमध्ये खाद्यतेल विक्रीसाठी साठविले होते. ते अत्यंत घाणेरडे, गंजलेले आढळून आले. सदर टिनाचा खाद्य तेल रिपॅकिंगसाठी पुनर्रवापर करण्यात येत असल्याचे कारवाईत पुढे आले आहे. शिवाय सदर खाद्य तेलाच्या शुद्धतेबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यामुळे या खाद्य तेलाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून ते जप्त करण्यात आले आहे. सदर खाद्य तेलाचे उत्पादक मनीष मार्केटींग व मनोज ट्रेडर्स हे दोन्ही अमरावती येथील असल्याचे या कारवाईत पुढे आले आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

सदरची कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांनी व त्यांच्या सहकाºयांनी केली आहे. जिल्ह्यात दिवाळी निमित्त अन्न पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. अन्न पदार्थाच्या शुद्धतेबाबत कोणतीही शंका निर्माण झाल्यास त्वरित अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल. तसेच भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.
- जी. बी. गोर, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, वर्धा.

Web Title: Adulterated edible oil seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.