‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ प्रशिक्षण

By Admin | Published: June 4, 2017 12:59 AM2017-06-04T00:59:29+5:302017-06-04T00:59:29+5:30

कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियान राबविले जात आहे.

'Advanced Agriculture, Prosperity Farmers' Training | ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ प्रशिक्षण

‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ प्रशिक्षण

googlenewsNext

कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा व जाम येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियान राबविले जात आहे. यात शेतकरी प्रशिक्षण घेण्यात येत असून सोयाबीन, तूर पिकाबद्दल तथा यांत्रिकीकरण व पशुपालन व्यवसायाबाबत तसेच कमी खर्चाचे तंत्रज्ञान याबाबत शेतकऱ्यांना अवगत करण्यात येत आहे.
उन्नत शेती समृद्ध शेतकरी या अभियानांतर्गत वर्धा उपविभागातील कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथे व हिंगणघाट उपविभागातील तालुका फळ रोपवाटिका जाम येथे २२ ते २७ मे पर्यंत प्रशिक्षण घेण्यात आले. यात सोयाबीन पिकाचे सुधारीत लावगड तंत्र व त्या अनुषंगाने कमी खर्चामध्ये उत्पादकता कशी वाढविता येईल, याबद्दल तंत्रज्ञान डॉ. रूपेश झाडोदे यांनी मार्गदर्शन केले. पीक उत्पादनात महत्त्वाची भूमिका असलेल्या रोग व किड यांच्या एकात्मिक व्यवस्थापनाबाबत डॉ. प्रशांत उंबरकर, यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमास उपविभागातील शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रशिक्षणात शेतकऱ्यांकडून उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सविस्तर चर्र्चा घडून त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात आले.
जिल्ह्यातील तूर हे सुद्धा एक महत्त्वाचे पीक असल्याने या पिकाबाबतही उपविभागातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान अवगत व्हावे तसेच शेतीला पूरक व्यवसाय म्हणून किफायतशीर पशुपालन याबाबत २९ मे ते ८ जून पर्यंत तालुका फळरोप वाटीका जाम येथे प्रशिक्षण सुरू आहे. यात शेतकरी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन तूर पिकाच्या लागवड तंत्र व त्यावरील किड रोगांचे व्यवस्थापन, पशुपालनाबाबत माहिती करून घेत आहे. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे, प्रा. उज्वला सिरसाट, डॉ. धनराज चौधरी, डॉ. उंबरकर, डॉ. झाडोदे, प्रा. अंकीता अंगाईतकर, प्रा. विशाल उंबरहंडे, गजानन म्हसाळ, किशोर सोळंके, उजाडे व कर्मचारी उपस्थित राहून जागृती करीत आहे.

Web Title: 'Advanced Agriculture, Prosperity Farmers' Training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.