अहिंसेच्या मार्गानेच उन्नती शक्य आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 10:00 PM2018-01-21T22:00:01+5:302018-01-21T22:01:18+5:30
देश समस्यांनी ग्रासला असतानाही विकसनशील राष्ट्राच्या यादीत भारताला मानाचे स्थान आहे. भारत एक समृद्ध राष्ट्र असूनही अंतर्गत बेबनाव सर्वांगीण विकासाला मारक ठरत आहे. वाढती लोकसंख्या हिंसाचार, आतंकवाद, नक्षलवाद आदी अनेक समस्यांवर परिस्थितीनुरूप तोडगा काढण्याचे आव्हान राष्ट्रासमोर उभे आहे;
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : देश समस्यांनी ग्रासला असतानाही विकसनशील राष्ट्राच्या यादीत भारताला मानाचे स्थान आहे. भारत एक समृद्ध राष्ट्र असूनही अंतर्गत बेबनाव सर्वांगीण विकासाला मारक ठरत आहे. वाढती लोकसंख्या हिंसाचार, आतंकवाद, नक्षलवाद आदी अनेक समस्यांवर परिस्थितीनुरूप तोडगा काढण्याचे आव्हान राष्ट्रासमोर उभे आहे; पण जग अहिंंसेच्या मार्गानेच जिंकता येऊ शकते. अहिंसेत उन्नतीचा मार्ग दडलेला आहे. हिच शिकवण भगवान गौतम बुद्धासह महापुरूष व राष्ट्रसंतांनी दिली, असे मत केंद्रीय दारूगोळा भांडाराचे प्रमुख ब्रिगेडिअर आय.व्ही.ओ.आर. गोल्डस्मिथ यांनी व्यक्त केले.
सीएडी कॅम्प येथील बुद्ध विहाराच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी धम्म मेळावा व सत्कार समारंभही घेण्यात आला. मोहन अग्रवाल यांनी ‘भगवान गौतम बुद्धाच्या अहिंसेच्या शस्त्राने जगातील कोणतेही युद्ध जिंकता येते. त्यांच्या संदेशाने संपूर्ण विश्वात शांती निर्माण करता येते, असे सांगितले. यावेळी इमरान राही, अनिल नरेडी, विहार समितीचे सचिव प्यारेलाल रामटेके, भन्ते माहागो गलणभबई, कमल धम्मोभबई, धम्मबोधी, विशुद्धानंद, उपअभियंता नाईक, अत्तरचंद खत्री, सत्कारमूर्ती मेजर शिवेंद्र त्रिपाठी, डॉ. प्रमोद नितनवरे, नितीन सिदुरकर आदी उपस्थित होते. मे २०१६ च्या रात्री भांडारात झालेल्या अग्निस्फोटात जीव धोक्यात घालणाºया मेजर त्रिपाठी यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दंत शिबिरात डॉ. वैभव व डॉ. विभा पाटणी यांनी ४०० रुग्णांची तपासणी केली. प्रास्ताविक रामटेके यांनी, संचालन रंजना जीवने यांनी केले तर आभार सुनील मून यांनी मानले. समाज बांधवानी सहकार्य केले.