अॅडव्हेंचर स्वयंसिद्ध मार्शल आर्ट ट्रेनिंग कॅम्प
By admin | Published: May 19, 2017 02:21 AM2017-05-19T02:21:50+5:302017-05-19T02:21:50+5:30
शहीद हुतात्मा स्मारक ग्राऊंड आंबेडकर चौक येथे १५ दिवसीय अॅडव्हेंचर स्वयसिद्धा मार्शल आर्ट ट्रेनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले ओह.
पंधरा दिवस प्रशिक्षण : विद्यार्थिनी, महिलांना सैनिकी प्रशिक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहीद हुतात्मा स्मारक ग्राऊंड आंबेडकर चौक येथे १५ दिवसीय अॅडव्हेंचर स्वयसिद्धा मार्शल आर्ट ट्रेनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले ओह. लॉयन्स ट्रॅडीशनल शोतोकॉन कराटे डो इंडिया, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लॉयन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थी, महिलांसाठी आयोजित शिबिरात मार्शल आर्टचे विविध प्रकार, महिला सुरक्षतेच्या उद्देशाने प्रशिक्षण, विद्यार्थिनींचे मनोबल वाढविण्यासाठी सैनिकी अॅडव्हेंचर प्रशिक्षण दिले जात आहे.
यामध्ये सकाळच्या सत्रात अॅडव्हेंचर सैनिकी प्रशिक्षण दिले जात आहे. यात अमोल मानकर, सायली वाघ, कनिजा खान, बाबू चौरागडे, साहील वाघ, सुयोग ठाकरे, गोलू मोरे, दिव्या मानवटकर, वैष्णवी भोयर, शालिनी मोरे, अरुण चवडे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण दिले जात आहे. यात रॅपलींग का क्रॉलींग रोप क्लॉबिंग सिलेद्रीग ब्रिज क्रॉसिंग, डिल, क्लॉबिंग रोड ट्रॅकींग आदींचा समावेश करण्यात आला आहे. या प्रशिक्षणामुळे शिबिरातील विद्यार्थ्यांमध्ये निर्भयता जागृत होत असून त्यांचा विश्वास वृद्धींगत होत असल्याचे मत उल्हास वाघ यांनी व्यक्त केले.
शिबिरात शहरातील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थिनी आणि महिलाही सहभागी होत असल्याचे दिसून आले आहे.