महाराष्ट्राच्या भावी पत्रकारांनी जाणून घेतले जलसंधारणाचे महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:15 PM2017-11-13T23:15:52+5:302017-11-13T23:16:14+5:30

बालकदिनाचे औचित्य साधून ‘लोकमत’ने बालकांसाठी एक पान संपादित करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती.

Advocates of water conservation are learned by the prospective journalists of Maharashtra | महाराष्ट्राच्या भावी पत्रकारांनी जाणून घेतले जलसंधारणाचे महत्त्व

महाराष्ट्राच्या भावी पत्रकारांनी जाणून घेतले जलसंधारणाचे महत्त्व

Next
ठळक मुद्देबालक दिनानिमित्त ‘लोकमत’चा विशेष उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बालकदिनाचे औचित्य साधून ‘लोकमत’ने बालकांसाठी एक पान संपादित करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. या उपक्रमात वर्धेतील काही शाळेतून निवडक मुलांनी सहभाग घेतला. बालदिनाच्या पूर्वसंध्येला वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांच्याशी या बालकांनी हितगूज करून जलसंधारण व पर्यावरणपूरक उपक्रमाची माहिती जाणून घेतली. विविध प्रश्नांच्या माध्यमातून डॉ. पावडे यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्यासह सामाजिक व पर्यावरण विषयक उपक्रमाची उकल केली. यात जिजामाता सबाने विद्यालयातील इयत्ता नववीची साक्षी निवल व प्रतिका ढगे, न्यू इंग्लिश हायस्कूलचे इयत्ता नववीतील श्रीरंग जोशी, प्रथमेश लव्हाळे, तसेच न.प. शिवाजी उच्च प्राथमिक शाळेचे जमीता नाडे, रोहन राऊत या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
नागरिकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यासोबत वृक्ष आणि जलसंधारणाची संकल्पना कधी सूचली हा प्रश्न प्रतिका ढगे हिने उपस्थित केला. यावर डॉ. पावडे म्हणाले आज ज्या प्रमाणात पाण्याबद्दल अडचणी निर्माण होत आहे, जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. भूजल पातळी खालावत आहे या समस्यावर मात करायचे असेल तर जलसंधारण हा पर्याय आहे याची माहिती होती म्हणून याच क्षेत्रात कार्य करायचे असे ठरविले. आज दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाची जी समस्या उद्भवली आहे. ती परिस्थिती आपल्यावर येवू नये म्हणून वृक्षरोपण कार्यक्रम हाती घेतले. मागील वर्षी ९०० तर यावर्षी ८००० वृक्ष लागवड केली. तसेच हनुमान टेकडीवर असलेल्या ९००० वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी या मंचच्या सदस्यांच्या माध्यमातून पार पाडत आहे.
श्रीरंग जोशी याने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना व तिला मिळणारा प्रतिसाद याबाबत विचारले असता, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला वर्धेकरांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. निर्माल्य संकलन गणपती व दुर्गादेवी मूर्त्यांचे विसर्जन व त्या गाळाचे संकलन करून ती माती मूर्तीकारांना पुनर्वापरासाठी देणे असे सहायक उपक्रमही राबवित असल्याचे सांगितले.
वैद्यकीय क्षेत्रात असताना सामाजिक क्षेत्रात येण्याचा विचार कसा झाला या प्रश्नावर साक्षीने डॉ. पावडे यांचे मत जाणून घेतले. रुग्णसेवेसह समाजात अनेक अडचणी आहे, याची जाण दैनंदिन कामकाजात होत गेली. अडचणी जशा कानावर पडत होत्या त्याचे उत्तर शोधण्यासाठी काय सहभाग राहू शकतो याचा विचार केला. यातूनच सामाजिक कार्य सुरू केले. व्हिजेएमच्या अन्य उपक्रमाची माहिती तिने यावेळी विचारली असता वैद्यकीय जनजागृती मंचच्या माध्यमातून जवळपास ४० प्रकारचे उपक्रम राबविले जात आहे. यात शिळ्या अन्नाची योग्यरित्या प्लास्टिक पिशव्या निर्मूलन, डेंग्यू आजाराबद्दल काळजी कशी घ्यावी, याविषयी जनजागृतीपर उपक्रम राबवित असल्याचे डॉ. पावडे यांनी यावेळी सांगितले.
जलसंधारणासह रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्र तयार केले यावर प्रथमेश लव्हाळे याने प्रश्न उपस्थित केला. मागील दोन वर्षात सदर यंत्र अत्यंत उपयुक्त ठरले आहे. यातून जवळजवळ १५० युनिट लावण्यात आले आहे. विहिरी, कालवे यांची पातळी वाढण्यात यंत्र उपयुक्त ठरले. हनुमान टेकडीवर ज्याप्रमाणे वृक्ष लागवड केली तशीच शहरातील अन्य भागात लागवड करणार का याविषयीचे प्रयोजन प्रथमेशने विचारले त्यावर डॉ. पावडे म्हणाले, पुढील वर्षी १३ कोटी वृक्षलागवडीचा सरकारचा संकल्प आहे. हनुमान टेकडीवर लावलेली झाडे जगतील याची खात्री आहे. शासनाकडून जागा उपलब्ध करून दिल्यास शेताच्या बांधावर वृक्ष लागवड करण्याचा संकल्प आहे. वृक्ष संवर्धन आणि जल संवर्धनाच्या कामात शासनाकडून कशा प्रकारे सहकार्य मिळाले यावर जमीता हिने प्रश्न उपस्थित केला. शासनासकडून जास्त मदतीची अपेक्षा न ठेवता चांगले कार्य करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. झाडाला पाणी देण्यासाठी तसेच वृक्षरोप आदी सुविधा शासनाकडून मिळाल्याचे यावेळी सांगितले.
बालक दिनाचा संदेश
डेंग्यू पासून स्वत:चा व कुटुंबीयाचा बचाव करण्यासाठी बालकांनी सहभाग घ्यावा. सर्वत्र स्वच्छता व जागृती आपल्याला विविध आजारांपासून दूर ठेवू शकतात. बालकांनी जनजागृतीपर उपक्रमात सक्रिय सहभाग ठेवला तर अनेक आजारांपासून स्वत:चे रक्षण करता येवू शकते. या माध्यमातून देश व समाज सुदृढ राखण्यात निश्चित वाटा असेल.

Web Title: Advocates of water conservation are learned by the prospective journalists of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.