१२ वर्षानंतर नटाळा गावात पोहोचली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:07 PM2018-07-17T22:07:03+5:302018-07-17T22:07:44+5:30

शहरापासून अवघ्या ३५ कि़मी. अंतरावर असलेल्या नटाळा गावातील विद्यार्थ्यांना नियमित शाळेत, कॉलेज मध्ये जाण्यासाठी पायी प्रवास करावा लागत होता. गावात बस येत नसल्यामुळे शहरासोबत संपर्क नसल्या सारखा होता गावातील विद्यार्थ्यांना पायी किंवा मिळेल त्या साधनानी शहरात जाऊन शिक्षण घ्यावे लागते.

After 12 years, the bus reached Natala village | १२ वर्षानंतर नटाळा गावात पोहोचली बस

१२ वर्षानंतर नटाळा गावात पोहोचली बस

Next
ठळक मुद्दे‘दिशा’ सामाजिक संस्थेचा पाठपुरावा : बसचे नागरिकांनी केले जल्लोषात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरापासून अवघ्या ३५ कि़मी. अंतरावर असलेल्या नटाळा गावातील विद्यार्थ्यांना नियमित शाळेत, कॉलेज मध्ये जाण्यासाठी पायी प्रवास करावा लागत होता. गावात बस येत नसल्यामुळे शहरासोबत संपर्क नसल्या सारखा होता गावातील विद्यार्थ्यांना पायी किंवा मिळेल त्या साधनानी शहरात जाऊन शिक्षण घ्यावे लागते. परंतु गावात तब्बल १२ वर्षानंतर पुन्हा एकदा बस सुरू झाली.
गावातील खडतर रस्ता आणि रस्त्याचे बांधकाम व्यवस्थित नसल्यामुळे १२ वर्षापूर्वी बस सेवा बंद झाली. ‘दिशा’ प्रकल्पाचे काम गावात मार्च २०१७ मध्ये सुरू झाल्यानंतर गावातील ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी सोबत भेटी व बैठका घेतल्यानंतर गावातील विद्यार्थ्यांची एक मुख्य समस्या समोर आली ती म्हणजे ८ व्या वर्गानंतर पुढील शिक्षणाकरिता शहरात जावे लागते. बस सेवा नसल्यामुळे विद्यार्थिनी शाळा सोडत आहे. पुढील शिक्षण घेत नसल्याचे समजले.
नटाळा आणि बोथली गावातील पालक, ग्रामस्थ, शाळा आणि विद्यार्थी यांना एका माळेत आणण्यासाठी दिशा टिम ने पुढाकार घेतला. दोन्ही गावातील ग्रामस्थांनी, पालकांनी एकत्रित पणे जो लढा सुरू केला त्याला आज यश मिळाले. १२ वर्षानंतर गावात बस सेवा सुरू झाली. बस सेवा उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बाल कल्याण समितीचे माजी सदस्य अजय पालीवाल, सरपंच शिला राऊत, उपसरपंच ताराचंद मसराम आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच रेखा यन्ने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय होलगिरवार आणि सर्व सदस्य तसेच राज्य व्यवस्थापक दिशा प्रकल्प महाराष्ट्र निक्की जयश्री परमानंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रफुल्ल उके, वैशाली मेश्राम, पुजा बेदरे, शुभम बेदरे व दिशा युथ क्लबचे सर्व सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांनी सहकार्य केले,

Web Title: After 12 years, the bus reached Natala village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.