अखेर अधीक्षकाच्या अतिरिक्त पदभाराचा गुंता सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:23 PM2018-11-19T22:23:59+5:302018-11-19T22:24:46+5:30
अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक या रिक्त पदाच्या अतिरिक्त कार्यभाराचा गुंता दोन दिवसात सोडवून वेतनाचा प्रश्न निकाली काढा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा म.रा.शि.प.तक्रार समितीच्यावतीने अजय भोयर यांच्या नेतृत्वात शिक्षण उपसंचालक, कोषागार अधिकारी तथा शिक्षणाधिकारी यांना दिला होता. या आदोलनाचा धसका घेत अधीक्षक पदाचा गुंता सोडविण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक या रिक्त पदाच्या अतिरिक्त कार्यभाराचा गुंता दोन दिवसात सोडवून वेतनाचा प्रश्न निकाली काढा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा म.रा.शि.प.तक्रार समितीच्यावतीने अजय भोयर यांच्या नेतृत्वात शिक्षण उपसंचालक, कोषागार अधिकारी तथा शिक्षणाधिकारी यांना दिला होता. या आदोलनाचा धसका घेत अधीक्षक पदाचा गुंता सोडविण्यात आला.
१ नोव्हेंबर रोजी रिक्त झालेल्या अधीक्षक पदाचा अतिरिक्त प्रभार ५ नोव्हेंबरला शिक्षण उपसंचालक नागपूर यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून त्याच कार्यालयातील मुख्य लिपीकाकडे सोपविला. परंतु सदर प्रभार हा राजपत्रित अधिकाऱ्यांकडे दिला नाही. या सबबीखाली कोषागार अधिकारी यांनी माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांचे वेतन देयक स्विकारण्यास नकार दिला. याबाबत शिक्षण उपसंचालक यांचेशी चर्चा केली असता, दुसरी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने हा प्रभार दिल्याचे संघटनेने सांगितले. प्राप्त माहितीनुसार नागपूर विभागातील इतर काही जिल्ह्यात अशा प्रकारचा अतिरिक्त पदभार दिलेला असून कोषागार कार्यालयाकडून कोणती हरकत घेण्यात आलेली नाही. या सर्व गुंतागुंतीमुळे जिल्ह्यातील शिक्षक व कर्मचाºयांचे वेतन १ तारखेला करण्यासाठी अडचण निर्माण झालेली आहे.
विशेष म्हणजे १ व २ जुलै २०१६ रोजी २० टक्के अनुदानासाठी पात्र घोषीत विना अनुदानित शाळेतील शिक्षकांचे वेतन दिवाळीपूर्वी मिळू शकले नाही. त्यामुळे म.रा.शि.प. तक्रार निवारण समितीच्यावतीने निवेदन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे लगेचच अधिक्षक पदाचा गुंता सोडविण्यात आल्याचे अजय भोयर यांनी सागिंतले.
निवेदन देताना तक्रार निवारण समिती व विना अनुदानित शाळा कृती समितीचे पुंडलिक नागतोडे, संजय बारी, गजानन साबळे, मुकेश इंगोले, दिपक कदम, विनय मुलकलवार, सुनील गायकवाड, मनीष मारोडकर, निलेश डहाके, रमेश पोराटे, दत्ता राऊळकर, अमित प्रसाद, मनीष गावंडे, प्रवीण घोडखांदे, रवी चौधरी, प्रनोज बनकर, दिलीप मारोटकर, गजानन मलकापूरे, सरोज तिवारी, संतोष जगताप, नरेश कुटेमाटे, विजय बावरे, मंगेश धुर्वे, सारंग परिमल, इवनाथे, पांडे आदी उपस्थित होते.