हवामान खात्याचा अलर्टनंतर जिल्हा प्रशासन हायअलर्ट!

By महेश सायखेडे | Published: July 17, 2023 07:41 PM2023-07-17T19:41:58+5:302023-07-17T19:42:09+5:30

पुढील सात दिवस पावसाचे : नदी काठावरील गावांवर वॉच

After the alert of the Meteorological Department, the district administration high alert! | हवामान खात्याचा अलर्टनंतर जिल्हा प्रशासन हायअलर्ट!

हवामान खात्याचा अलर्टनंतर जिल्हा प्रशासन हायअलर्ट!

googlenewsNext

वर्धा : पुढील सात दिवस विदर्भात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याच्या नागपूर येथील वेधशाळेने वर्तविली आहे. मागील वर्षी जिल्ह्यात वेळोवेळी अतिवृष्टी होत नैसर्गिक आपत्ती ओढावली होती, तर यंदा जिल्हा प्रशासनाने नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी विशेष नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हवामान खात्याच्या अलर्टनंतर जिल्हा प्रशासन हायअलर्टवर आले असून नदी काठावरील गावांवर विशेष वॉच ठेवला जात आहे. मागील वर्षी जिल्ह्यात वेळोवेळी अतिवृष्टी होत पूरस्थिती ओढावली होती. त्यावेळी नदी काठावरील अनेक गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते, तर आता पुढील सात दिवस वर्ध्यासह संपूर्ण विदर्भात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेत आठही तालुका प्रशासनाला काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

नदी काठावर २१४ गावे
वर्धा जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६,३१० चौ. कि.मी. आहे. शिवाय प्रशासनाच्या सोयीसाठी आर्वी, आष्टी, कारंजा, देवळी, वर्धा, समुद्रपूर, सेलू व हिंगणघाट या आठ तालुक्यांत जिल्ह्याची विभागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात नदी काठावर तब्बल २१४ गावे असून पुढील सात दिवस जिल्हा प्रशासनाचा या गावांवर वॉच राहणार आहे.

१,१८७ व्यक्तींनी घेतले प्रशिक्षण
मागील वर्षी वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यावर पूरस्थितीचे संकट ओढावले. त्यावेळी अनेक व्यक्तींना सुरक्षित ठिकाणीही हलविण्यात आले. तशीच परिस्थिती यंदा उद्भवल्यास युद्धपातळीवर शोध व बचाव कार्य करता यावे या हेतूने यंदा जिल्ह्यातील तब्बल १ हजार १८७ व्यक्तींना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. याच व्यक्ती नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.

नऊ पथक अलर्ट मोडवर
मुसळधार पावसादरम्यान जिल्ह्यात पूरस्थिती ओढावल्यास शोध व बचाव कार्यासाठी जिल्ह्याच्या आठही तालुकास्तरावर प्रत्येकी एक शोध व बचाव पथक तयार करण्यात आले आहे, तर जिल्हा स्तरावर एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकांतील अधिकाऱ्यांचेही नदीकाठावरील गावांवर बारकाईने लक्ष आहे.

ग्राफकुठल्या तालुक्यात किती गावे नदी काठावर?
वर्धा : २६
सेलू : ३३
देवळी : २९
आर्वी : ३३
आष्टी : १५
कारंजा : १३
हिंगणघाट : ३३
समुद्रपूर : ३१

कुठल्या तालुक्यातून कुठल्या प्रमुख नद्या वाहतात?
वर्धा : धाम नदी, बोर नदी, भदाडी नदी, यशोदा नदी, शेर नदी/नाला.
सेलू : धाम नदी, बोर नदी, वाघाडी नाला, पंचधारा धरण.
देवळी : वर्धा नदी, यशोदा नदी, भदाडी नदी.
आर्वी : वर्धा नदी, बाकळी नदी, धामनदी, बोर (दातपाडी) नाला.
आष्टी : वर्धा नदी, बाकळी नदी/नाला, कड नदी.
कारंजा : खडक नदी, कार नदी.
हिंगणघाट : वर्धा नदी, वणा नदी, यशोदा नदी, पोथरा नदी.
समुद्रपूर : वणा नदी, धाम नदी, बोर नदी, पोथरा नदी.

Web Title: After the alert of the Meteorological Department, the district administration high alert!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा