वर्धा येथील हिंदी विद्यापीठात भावी शिक्षकांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 02:24 PM2019-03-05T14:24:08+5:302019-03-05T14:25:24+5:30
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील डीएड व बीएडच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी आपल्या विविध मागण्यांसाठी विद्यापीठातील उपकुलगुरूंच्या दालनासमोर धरणे दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील डीएड व बीएडच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी आपल्या विविध मागण्यांसाठी विद्यापीठातील उपकुलगुरूंच्या दालनासमोर धरणे दिले. यावेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी हिताचा विचार न करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाचा मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध नोंदविला. विशेष म्हणजे या प्रकरणी विद्यापीठाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तेथील जबाबदार अधिकाऱ्यांनी बोलण्याचे नाकारले. यामुळे विद्यापीठ प्रशासन विद्यार्थी विरोधी धोरण तर राबवित नाही ना, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. सदर आंदोलनात डीएड व बीएडचे सुमारे १०० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.