कृषी सहायक ते कृषी संचालक आंदोलनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 10:36 PM2018-09-06T22:36:49+5:302018-09-06T22:38:25+5:30

कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील कृषी सहायक ते कृषी संचालक या क्षेत्रीय व कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ३ सप्टेंबरपासून आंदोलन सुरू केले आहे. सात टप्प्यात सदर आंदोलन होणार आहे. प्रशासनात दुय्यम स्थान देण्यात आल्यामुळे अधिकारी, कर्मचारी यांच्यात प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Agricultural Assistant to Agricultural Director on agitation | कृषी सहायक ते कृषी संचालक आंदोलनावर

कृषी सहायक ते कृषी संचालक आंदोलनावर

Next
ठळक मुद्दे११ ला दुसरा टप्पा : राज्यात सात टप्प्यात आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील कृषी सहायक ते कृषी संचालक या क्षेत्रीय व कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ३ सप्टेंबरपासून आंदोलन सुरू केले आहे. सात टप्प्यात सदर आंदोलन होणार आहे. प्रशासनात दुय्यम स्थान देण्यात आल्यामुळे अधिकारी, कर्मचारी यांच्यात प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ३ सप्टेंबरपासून शासनास सादर करण्यात येणारे अहवाल थांबवून असहकार पुकारण्यात आले आहे. कृषी विभागाचे मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत संपाची नोटीस देण्यात आली आहे.
शासकीय योजनाची अंमलबजावणी करताना होणाऱ्या दमबाजी, मारहाण आदीपासून पोलीस संरक्षण मिळणे व पाटण येथील कृषि अधिकाऱ्यास मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक व्हावी. तांत्रिक संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी व दर्जेवाढीबाबत केंद्र शासनाच्या विविध समित्यांनी केलेल्या शिफारसी स्वीकाराव्यात. डबलींग फार्मर्स इनकम कमिटीच्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी करावी. कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध पिरॅमिडीक तयार करताना महासंघास विश्वासात घेण्यात यावे. उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय आणि आत्मा कार्यालय कायम ठेवण्यात यावे आदी मागण्याचा समावेश आहे.
आंदोलनाचे टप्पे
मागणीची नोटीस देणे ३ सप्टेंबर, काळ्या फिती लावून शासकीय कामकाज करणे ११ ते २३ सप्टेंबर, लेखणीबंद आंदोलन- २४ सप्टेंबर ७ आॅक्टोबर, जिल्हास्तरीय मोर्चा ८ आॅक्टोबर, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे ९ आॅक्टोबर, साखळी उपोषण १० ते २१ आॅक्टोबर, बेमुदत संप २२ आॅक्टोबरपासून करणार आहे.

Web Title: Agricultural Assistant to Agricultural Director on agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.