साई यात्रा महोत्सवात कृषी मार्गदर्शन व मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 10:06 PM2017-12-05T22:06:47+5:302017-12-05T22:07:32+5:30
श्री संत साई यात्रा महोत्सवानिमित्त कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा तथा साई यात्रा उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिर परिसरात कृषी मार्गदर्शन व मेळावा घेण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
आंजी (मोठी) : श्री संत साई यात्रा महोत्सवानिमित्त कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा तथा साई यात्रा उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिर परिसरात कृषी मार्गदर्शन व मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मनोहर मंगरूळकर तर मार्गदर्शक म्हणून अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत उंबरकर, अतिथी म्हणून जि.प. शिक्षण आरोग्य सभापती जयश्री गफाट, माजी सरपंच दीपक बावणकर, तालुका कृषी अधिकारी एस.एस. मुडे, पं.स. कृषी अधिकारी राऊत उपस्थित होते.
शेतकºयांना मार्गदर्शन करताना भारती यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. सदर योजनांचा शेतकºयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. डॉ. उंबरकर यांनी सध्या शेतकऱ्यांची समस्या असलेल्या बोंडअळीचे आक्रमण यावर सविस्तर माहिती दिली. ३ डिसेंबरच्या शेवटपर्यंत बाधित कपाशीचे पीक नष्ट करावे. यामुळे पुढील वर्षी हा प्रादुर्भाव होणार नाही, असेही सांगितले.
याप्रसंगी प्रगतशील शेतकरी मुरलीधर चौधरी बोरगाव, सुनील भालेराव पेठ यांचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुनील गफाट यांनी केले. संचालन मोहीन शेख यांनी केले तर उपस्थितांचे आभार दीपक बावनकर यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाकरिता मंडळ कृषी अधिकारी भाष्कर मेघे, कृषी सहायक रोहन अवचार, वहाने, निमजे, विजय गोमासे, संतोष बालपांडे, सुरेश गिरडकर, सुनील हंबर्डे आदींनी सहकार्य केले. मेळाव्याला आंजी (मो.) आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यामध्ये कृषी विभाग तथा विविध संस्था, शेतकऱ्यांनी विविध पीक उत्पादनाचे प्रदर्शन लावले होते. या प्रदर्शनाला भेट देत अधिकारी व शेतकऱ्यांनी पिकांबाबत माहिती जाणून घेतली. यात्रा महोत्सवात अशा प्रकारचे आयोजन केल्याने नागरिकांनीही बोध घेतला.
प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना मिळाले नवे ज्ञान
श्री संत साई यात्रा महोत्सवाचे निमित्त साधून कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व आत्मा तथा यात्रा समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मेळावा घेण्यात आला. यात कृषी विभाग, संस्था व प्रगतशील शेतकºयांनी उत्पादनाचे प्रदर्शनही लावले होते. या प्रदर्शनातून शेतकºयांना नवे ज्ञान प्राप्त करता आले.