कृषी विभागाने शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 10:55 PM2017-11-18T22:55:09+5:302017-11-18T22:55:32+5:30

देशातील जनतेला गरीबी पासून मुक्ती द्यावयाची असेल तर कृषी क्षेत्राचा विकास करणे आवश्यक आहे.

The Agriculture Department should extend the government schemes to the farmers | कृषी विभागाने शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात

कृषी विभागाने शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात

Next
ठळक मुद्देरामदास तडस : शेतकरी हितार्थ योजनांची दिली माहिती

आॅनलाईन लोकमत
देवळी : देशातील जनतेला गरीबी पासून मुक्ती द्यावयाची असेल तर कृषी क्षेत्राचा विकास करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचीही गरज आहे. शेतकऱ्यांच्या हितार्थ सरकार विविध योजना राबवित असून त्याचा कृषी विभागाने गरजू शेतकऱ्याला लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी केले. ते स्थानिक नगर भवन येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मार्गदर्शन करीत होते.
भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला पं. स. सभापती विद्या भुजाडे, नगराध्यक्ष सुचिता मडावी, न. प. उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र मदनकर, तहसीलदार तेजस्विनी जाधव, कृषी विभागाचे उपसंचालक जी. आर. कापसे, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळचे सुरेश नेमाडे, सेलसुरा येथील कृषी केंद्राचे डॉ. प्रशांत उंबरकर, मत्स्य विकासचे सहायक आयुक्त एस. बी. डोंगरे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय खोपडे, माजी नगराध्यक्ष शोभा तडस, दीपक फुलकरी, अमृत झाडे, गुरुसिंग पाखल, मनोज सोणवने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
खा. तडस पुढे म्हणाले, देशातील शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे. यासाठी शेतकºयांनीही केवळ शेतीच्या पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिली पाहिजे. देशातील शेतकºयांची स्थिती आज दयनिय आहे. सर्वप्रकारे आज शेतकरी भरडला जात असल्याने शेतकºयांनी कुक्कुटपालन, मत्स्य पालन, दुधाळ जनावरे पालन आदी शेतीला पूरक व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे. सदर व्यवसायांसाठी सरकारच्यावतीने विविध योजनाही राबविल्या जात आहेत. त्याचा लाभ शेतकºयांनी घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
हवालदिल शेतकºयांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी हा कायमस्वरुपी उपाय नसून शेतकºयांनी आपली शेती आपणच घडविली पाहिजे. शेतीतील नवनवीन प्रयोगाबाबत खात्री पटली तरच ते तंत्रज्ञान किंवा ते प्रयोग शेतकरी स्वीकारतात. त्या दृष्टीकोनातून कृषी विज्ञान केंद्रामध्ये करण्यात येणाºया कृषी विषयक प्रयोगाबाबत शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण झाला पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकºयांनी करावा असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी एस. बी. डोंगरे, कापसे, सुरेश नेमाडे, प्रशांत उंबरकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी प्रगतशील शेतकरी अमृत झाडे व गुरुसिंग पाखल यांनी अनुभव कथन केले. कार्यक्रमादरम्यान खा. तडस व मान्यवरांच्या हस्ते शेतकरी झाडे व पाखल यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात तालुक्यातील दहा शेतकºयांना कृषी यांत्रिकी योजनेंतर्गत ७५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच क्षेत्रिय प्रचार कार्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या निबंध व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांनाही याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमापूर्वी नगर परिषद शाळा येथून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाला संजय तिवारी, रामचंद्र सोनसळ आदी उपस्थित होते. यावेळी लावण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाची मान्यवरांसह शेतकºयांनी पाहणी करीत साहित्य खरेदी केले.

Web Title: The Agriculture Department should extend the government schemes to the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.