ध्येयवेड्या तरुणाचा वृक्षलागवड आणि संगोपनाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 10:14 PM2019-06-08T22:14:03+5:302019-06-08T22:15:22+5:30

माटोडा, बेनोडा गावातील सूरज हरिश्चंद्र्रराव नाखले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेला तरुण. गावानजीकच असलेल्या स्मशानभूमीत झाडे लावून ती भरउन्हात जगविण्यासाठी आटापिटा करणारा एक पर्यावरणप्रेमी. हल्ली ५ जून म्हटल्यावर सर्व लोक झाडे लावा वैगरेचे फोटो पोस्ट करतात.

Aim for the purpose of tree plantation and pick-up | ध्येयवेड्या तरुणाचा वृक्षलागवड आणि संगोपनाचा संकल्प

ध्येयवेड्या तरुणाचा वृक्षलागवड आणि संगोपनाचा संकल्प

Next
ठळक मुद्देमाटोड्यात मुरमाड जमिनीवर फुलविले नंदनवन

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : माटोडा, बेनोडा गावातील सूरज हरिश्चंद्र्रराव नाखले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेला तरुण. गावानजीकच असलेल्या स्मशानभूमीत झाडे लावून ती भरउन्हात जगविण्यासाठी आटापिटा करणारा एक पर्यावरणप्रेमी. हल्ली ५ जून म्हटल्यावर सर्व लोक झाडे लावा वैगरेचे फोटो पोस्ट करतात. पण; आज गरज खरी गरज आहे, यी पर्यावरणप्रेमींना प्रकाशझोतात आणण्याची. त्यांना कधीही प्रसिद्धीची हाव नसते. त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेऊ शकतो.
माटोडा बेनोडा येथील स्मशानभूमीची जागा म्हणजे मुरमाड. या जमिनीवर नंदनवन फुलविण्याचा ध्यास सूरजने घेतला. रोज तो सकाळी व सायंकाळी हातात जमीन खोदण्यासाठी लागणारे अवजारे घेऊन जायचा. सोबतच रस्त्यावर पडलेले शेणसुद्धा. २ फूट गोलाकार जमीन खोदून त्यात शेण, गोवऱ्या व माती भरायचा. बकेट घेऊन चार, आठ दिवस पाणी टाकायचा. मग नंतर झाडे लावायचा. यावर्षी ज्या उन्हात उभे राहणेदेखील कठीण झाले होते, तेथे जवळपास आज ६ ते ७ वड, पिंपळ, पाखड यासारखे वृक्ष मोठ्या डौलाने उभे आहेत. कारण त्यामागे सूरज यांचे परिश्रम आहेत.
वर्षभरात जवळपास १०० झाडे लावण्याचा संकल्प सूरज यांनी केला आहे. कुठलीही प्रसिद्धी न करता व कुणालाही त्रास न देता नाखले यांचे हे काम सुरू आहे. समाजातील नागरिकांनी सुद्धा प्रेरणा घेऊन झाडे लावावी व समाजातील अशा लोकांना साथ देण्याची आज गरज निर्माण झाली आहे.
 

Web Title: Aim for the purpose of tree plantation and pick-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.