लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेमुळे ‘हवाई सफर’चे स्वप्न पूर्ण

By Admin | Published: June 24, 2016 02:28 AM2016-06-24T02:28:11+5:302016-06-24T02:28:11+5:30

विमान आकाशातून जाताना त्याकडे कुतुहलाने बघायचो. आपल्याला विमानात बसण्याची संधी केव्हा मिळेल,

'Air travel' dream of Lokmat SanskRAR Moti competition | लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेमुळे ‘हवाई सफर’चे स्वप्न पूर्ण

लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेमुळे ‘हवाई सफर’चे स्वप्न पूर्ण

googlenewsNext

मलय लोकरे : हवाई सफरबाबत त्याच्या मित्रांमध्येही कमालीचे कुतुहल
वर्धा : विमान आकाशातून जाताना त्याकडे कुतुहलाने बघायचो. आपल्याला विमानात बसण्याची संधी केव्हा मिळेल, असे मनोमन वाटायचे. परंतु, इतक्या लवकर ही संधी येईल, याचा जराही विचार केला नव्हता. लोकमत संस्काराच्या मोती स्पर्धेत भाग घेतला आणि त्यात मला हवाई सफरची संधी चालून आली. आकाशाकडे बघून आकाशात झेप घेण्याचे बघितलेले स्वप्न पूर्ण होत असल्यामुळे आनंद गगनात मावेनासा झाला, ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया हवाई सफरचा विजेता मलय विजय लोकरे या विद्यार्थ्याची.
मलय हा मसाळा येथील अग्रगामी स्कूलचा इयत्ता चवथीचा विद्यार्थी आहे. मलय शुक्रवारी सकाळी ५.४५ वाजता नागपूर येथील विमानतळावरुन विमानाने दिल्लीला जाणार आहे. यासाठी तो गुरुवारी सायंकाळीच नागपूरला रवाना झाला. याप्रसंगी त्याला लोकमत परिवारातर्फे शुभेच्छा दिल्या.
यावेळी अग्रगामी स्कूलच्या प्राचार्य विद्या, उपप्राचार्य अशिर्ता, मलयची आई अंजली लोकरे उपस्थित होते. प्राचार्य विद्या यांनी मलय हा हुशार विद्यार्थी असल्याचे सांगितले.
लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेमुळे त्याला हवाई सफर करता येणार याबद्दल आनंद व्यक्त करीत मलयला शुभेच्छा दिल्या.
मलय म्हणाला, मी खूप एक्साईट आहे. विमानात केव्हा बसतो, असे झाले आहे. पहिल्यांदाच मी विमानात बसणार आहे. माझ्या मित्रांना पण माझ्या विमान प्रवासाबद्दल कुतुहल आहे. मी त्यांना सांगितले.
लोकमतने घेतलेल्या संस्काराच्या मोती स्पर्धेमुळे मला विमानात बसण्याची संधी मिळत आहे. तेव्हा माझ्या मित्रांनीही या स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा बोलून दाखविल्याचे तो म्हणाला. या स्पर्धेत यापुढेही नियमित सहभागी होत राहणार, असा निर्धारही मलयने बोलून दाखविला.
मलयची आई अंजली लोकरे या अग्रगामी स्कूलमध्येच शिक्षिका आहे. वडिल उन्नती मोटर्समध्ये टीम लीडर म्हणून कर्तव्य बजावतात. त्यांनी सुद्धा मलय हा हवाई सफरबाबत खूप उत्साही असल्याचे सांगितले.(उपक्रम प्रतिनिधी)

हवाई सफरसाठी निवड झाल्यापासून मलय कमालीचा उत्साही
मलयने २०१५ मध्ये लोकमततर्फे घेण्यात आलेल्या संस्काराच्या मोती स्पर्धेत भाग घेतला होता. यामध्ये तो हवाई सफरचा विजेता ठरला. ही बाब त्याला माहित होताच त्याचा आनंद ओसंडून वाहत आहे. आणि तेव्हापासून तो हवाई सफर कशी राहील. विमानात बसल्यानंतर कसे वाटणार, विमान आकाशात उडल्यानंतर खाली बघितल्यानंतर कसे दिसणार, विमानाने दिल्लीला गेल्यानंतर किती मज्जा येईल. दिल्लीत कुणाला भेटणार, काय काय बघणार, असे असंख्य प्रश्न त्याच्या डोक्यात रुंझी घालत असल्याची प्रतिक्रिया मलयची आई अंजली लोकरे यांनी दिली.

Web Title: 'Air travel' dream of Lokmat SanskRAR Moti competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.