आयटक, सिटूचे धरणे आंदोलन

By admin | Published: January 21, 2017 01:02 AM2017-01-21T01:02:10+5:302017-01-21T01:02:10+5:30

केंद्राने जाहीर केल्याप्रमाणे अंगणवाडी, आशा व गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा.

Aitak, Citoon Dhara movement | आयटक, सिटूचे धरणे आंदोलन

आयटक, सिटूचे धरणे आंदोलन

Next

आमदार, खासदारांना निवेदन : आश्वासन न पाळल्याने नोंदविला निषेध
वर्धा : केंद्राने जाहीर केल्याप्रमाणे अंगणवाडी, आशा व गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा. लोकप्रतिनिधींनी लोकसभा, विधानसभेत मागण्या लावून धराव्या यासाठी आयटकने शुक्रवारी खा. रामदास तडस व आ.डॉ. पंकज भोयर यांना त्यांचे कार्यालय गाठून निवेदन दिले.
तत्पूर्वी, अंगणवाडी सेविका, आशा व गटप्रवर्तक महिलांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चा काढून खा. तडस व आ.डॉ. भोयर यांचे कार्यालय गाठले. यावेळी राज्य व केंद्र शासनाने केलेल्या घोषणेप्रमाणे येणाऱ्या बजेट सत्रात आर्थिक तरतूद करावी. योजना कामागारांसाठी शासन आदेश काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.


 

Web Title: Aitak, Citoon Dhara movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.