आयटकचा महागाई, खासगीकरण विरोधात एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2022 05:00 AM2022-06-01T05:00:00+5:302022-06-01T05:00:33+5:30
पेट्रोलियम पदार्थावरील सर्वप्रकारचे सेस व सरचार्ज मागे घ्या. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गव्हाचे वितरण पूर्वरत करा. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सर्व जीवनावश्यक वस्तू, विशेषत: डाळी आणि खाद्यतेलाचा पुरवठा झालाच पाहिजे. आयकर लागू नसलेल्या सर्व कुटुंबांना दरमहा ७ हजार ५०० हस्तांतरित करा. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या तरतुदीत वाढ करा. बेरोजगार भत्ता देण्यासाठी केंद्रीय कायदा करा.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने वाढती महागाई, खासगीकरण व बेरोजगारी यासह योजना कामगारांच्या विविध मागण्यांकरिता मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये ठिय्या देऊन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
पेट्रोलियम पदार्थावरील सर्वप्रकारचे सेस व सरचार्ज मागे घ्या. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गव्हाचे वितरण पूर्वरत करा. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सर्व जीवनावश्यक वस्तू, विशेषत: डाळी आणि खाद्यतेलाचा पुरवठा झालाच पाहिजे. आयकर लागू नसलेल्या सर्व कुटुंबांना दरमहा ७ हजार ५०० हस्तांतरित करा. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या तरतुदीत वाढ करा. बेरोजगार भत्ता देण्यासाठी केंद्रीय कायदा करा. शहरी भागासाठी रोजगार हमी योजनेचा कायदा करा, सर्व रिक्त जागा त्वरित भरा तसेच केंद्र सरकाने केलेली कामगारविरोधी चार श्रमसंहिता रद्द करा. देशाला आत्मनिर्भर बनविणाऱ्या रेल्वे, विमा, बँक, डिफेन्स कोल, पेट्रोलियम, टेलिफोन, आरोग्य व शिक्षण आदी सार्वजनिक क्षेत्राच्या खासगीकरणाचे धोरण मागे घ्या आणि अंगणवाडीसेविका, मदतनीस, आशा, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी, अंशकालीन स्त्री-परिचर, उमेद वर्धिनी, कंत्राटी आरोग्यसेविका आदी कामगारांना कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन व सामाजिक सुरक्षा लागू करा, यासह आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव मनोहर पचारे, विजया पावडे, संयुक्त कामगार संघटनेचे गुणवंत डकरे, आयटक जिल्हा सचिव वंदना कोळणकर, सुरेश गोसावी, सोनाली पडोळे, द्वारका इमडवार, गजेंद्र सुरकार, मैना उईके, ज्ञानेश्वरी डंबारे, मंगला इंगोले, शबाना शेख, अल्का भानसे, अरुणा गावंडे, वंदना रेवतकर, सुजाता भगत, सुनंदा आखाडे, विनायक नन्नोरे, ज्योस्तना राऊत, प्रतिभा वाघमारे, वीणा पाटील, रेखा तेलतुंबडे, प्रज्ञा नाईक, प्रमिला वानखेडे, निर्मला देवतळे, वैशाली नंदरे, जयमाला बेलगे, रेखा नवले, सिंधू खडसे, मंजू शेंडे, ज्योत्सना मुंजेवार, नंदा महाकाळकर, आम्रपाली बुरबुरे, ज्योती फुलझेले, शबाना खान, रेखा कोठेकर, वच्छला परतेकी, शोभा पाटमासे, जयश्री पाटील, तारा थेटे, सिंधू इंगळेसह अंगणवाडी सेविका व मदतनीसांची उपस्थिती होती.