कानगावात दारूविक्रीने गाठला कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 09:27 PM2019-08-06T21:27:58+5:302019-08-06T21:28:33+5:30

नजीकच्या कानगाव येथे ठिकठिकाणी गावठी व देशी तसेच विदेशी दारूची विक्री होत आहे. त्यामुळे गावातील महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे सदर अवैध दारूविक्रीच्या प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने पोलिसांच्या कार्य प्रणालीवर नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Alcohol has reached its peak in Kanagawa | कानगावात दारूविक्रीने गाठला कळस

कानगावात दारूविक्रीने गाठला कळस

Next
ठळक मुद्देपोलिसांचे दुर्लक्ष : समित्या नाममात्र, महिलांना सहन करावा लागतोय नाहक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क
वायगाव (नि.) : नजीकच्या कानगाव येथे ठिकठिकाणी गावठी व देशी तसेच विदेशी दारूची विक्री होत आहे. त्यामुळे गावातील महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे सदर अवैध दारूविक्रीच्या प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने पोलिसांच्या कार्य प्रणालीवर नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येथील दारूविक्रीला आवर घालण्यासाठी पोलिसांनी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे. शिवाय तशी मागणी आहे.
कानगाव येथे परिसरातील मद्यशौकीन दारू ठोसण्यासाठी येतात. त्यामुळे दारूविक्रेत्यांच्या घरासमोर नेहमीच मद्यपींची गर्दी राहते. इतकेच नव्हे तर दारूच्या नशेत बेधुन्द झालेले मद्यपी बरेचदा शिविगाळ करीत असल्याने गावातील शांतता भंग होत आहे. शिवाय हा प्रकार एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारा ठरत आहे. गावातील दारूविक्रीचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागत आहे. कानगाव हे गाव अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येते. परंतु, या पोलीस कचेरीतील काही पोलीस कर्मचारी दारूविक्रेत्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंधच जोपासण्यात धन्यता मानत असल्याची ओरड परिसरातील नागरिकांकडून होत आहे. अनेक मद्यपी मद्यधुंद अवस्थेत वाहन पळवित असल्याने हा प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. विशेष म्हणजे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे कायद्यान्वये गुन्हा आहे. मात्र अशा बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी अल्लीपूर पोलीस प्रयत्न करीत नाहीत. गावातील विविध समिती नावालाच शिल्लक राहिल्या असून पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी लक्ष देत कानगावात दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना द्याव्या, अशी मागणी आहे. गावात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अल्लीपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या विविध गावांमध्ये दारूबंदी महिला मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, सदर मंडळाच्या महिलांना पोलिसांकडूनच पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्याने दारू निर्मिती व विक्रीच्या व्यवसायाला उधाण आल्याचे दिसून येते. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असताना कानगावात देशी, विदेशी व गावठी दारू सहज मिळत आहे.

दारूविक्रेत्यांना सर्वांचेच अभय
कानगावात पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अस्तित्वात आहे. परंतु, या संदर्भात कुणीही एक शब्द काढत नाही. तसेच दारूविक्रेत्यांवर कुठली कारवाई होत नसल्याची ओरड होत आहे.
दारू विक्रेत्यांना पोलिसांसह राजकीय पुढाऱ्यांचेही आशीर्वाद मिळत असल्याचे गावातीलच महिलांमध्ये चर्चा होत आहे. सायंकाळी कानगावातील दारूविक्रेत्यांच्या घरासमोर मद्यपींची गर्दी होते.
नजीकच्या नेरी (मिरापूर) या गावात दारूबंदी असून या गावातील अनेक मद्यपी दारू रिचविण्यासाठी कानगावात येत असल्याचे दिसून येते. येथील दारूविक्रेत्यांवर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेऊन प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी आहे.

Web Title: Alcohol has reached its peak in Kanagawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.