वाहनांचे ‘अलायमेंट’ बिघडले अन् आता ‘अॅव्हरेज’ ही घटला,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 05:00 AM2021-05-21T05:00:00+5:302021-05-21T05:00:11+5:30
चारचाकी वाहनांना दर ५ हजार किलो मीटर प्रवास झाल्यावर अलायमेंट आणि बॅलेंसिगची गरज असते. बरीच वाहने आता अलायमेंट व बॅलेंसिंगवर आली आहे. बऱ्याच वाहनांची ऑईल काळे आले असून त्यांच्या सर्व्हिसिंगची गरज आहे. पण, सर्व्हिसिंग सेंटरच बंद असल्याने वाहने खिळखिळे होऊन अॅव्हरेजही घटला. परिणामी पेट्रोलचा खर्च वाढल्याने अनेकांनी आता वाहने घरातच उभी करुन ठेवल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : माणसाचे जीवन चक्राप्रमाणे गतिमान झाले असून या धावपळीत वाहनांचा मोठा आधार मिळत आहे. त्यामुळे माणसांच्या आरोग्यासोबतच वाहनांचेही आरोग्य जपण्यासाठी त्यांची नियमित सर्व्हिसिंग होणे आवश्यक आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यांपासून सर्व दुकाने बंद असल्याने सध्या वाहनांचे ‘अलायमेंट’ बिघडले अन् ‘अॅव्हरेज’ ही घटला आहे. पण, पर्याय नसल्याने आहे त्याच परिस्थितीत वाहन चालकांचा दे धक्का सुरु आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटीमध्ये जिल्ह्यात १५ मे पासून लॉकडाऊन करण्यात आला. सुरुवातीला अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने तेव्हापासून दुचाकी व चारचाकी वाहनांचे सर्व्हिसिंग सेंटर आणि चारचाकी वाहनांचे अलायमेंट व बॅलंसिंग सेंटर बंद करावे लागले. सध्या लॉकडॉऊन असल्यामुळे टॅक्सीचाही व्यवसाय अडचणीत आल्याने बºयाच वाहनचालकांनी आपली वाहने शासकीय कामात लावली आहे. तर काहींची वाहने अद्यापही अत्यावश्यक सुविधांच्या नावाने रस्त्यांवर धावतांना दिसत आहे. वाहने धावत असल्याने त्यांच्यामधील ऑईल नियमित बदलवून वाहनांची सर्व्हिसिंग करणे आवश्यक असते. यासोबतच चारचाकी वाहनांना दर ५ हजार किलो मीटर प्रवास झाल्यावर अलायमेंट आणि बॅलेंसिगची गरज असते. बरीच वाहने आता अलायमेंट व बॅलेंसिंगवर आली आहे. बऱ्याच वाहनांची ऑईल काळे आले असून त्यांच्या सर्व्हिसिंगची गरज आहे. पण, सर्व्हिसिंग सेंटरच बंद असल्याने वाहने खिळखिळे होऊन अॅव्हरेजही घटला. परिणामी पेट्रोलचा खर्च वाढल्याने अनेकांनी आता वाहने घरातच उभी करुन ठेवल्याचे दिसून येत आहे.
ना पंक्चर दुरुस्तीचे सोय, ना हवा भरण्याची
n‘घरात रहा...सुरक्षित रहा...’ असे आवाहन करुन शासनाने लॉकडाऊन केला आहे. पण, अत्यावश्यक सुविधा तसेच इतर महत्वांच्या कामाकरिता नागरिकांना घराबाहेर पडावे लागत असल्याने वाहनांची आवश्यक पडत आहे. परंतु सध्या ना पंक्चर दुरुस्तीची सोय आहे ना हवा भरण्याची. त्यामुळे काहींनी वाहने उभी करुन सायकलीचा आधार घेत आहे तर काही कमी हवेतही वाहने दामटविताना दिसत आहे. ही बाब मात्र खऱ्या अर्थाने चारचाकी वाहनांकरिता फार अडचणीची ठरत आहे.
वाहनचालकांसमोर अडचणी
- सर्व्हिसिंगअभावी अॅव्हरेज घटला
- वाहने खिळखिळी झाली
- पंक्चर दुरुस्तीची कोणतीही सोय नाही
- अलायमेंटअभावी टायरवर परिणाम
- ऑईल बदलेले नसल्याने इंजिनला नुकसान
- वाहनांचे कोणतेही पार्ट मिळणे नाहीच
माझे अलायमेंट आणि बॅलंन्सिंगचे काम असून पूर्वी दरदिवसाला दहा ते पंधरा वाहने यायची. दर पाच हजा किलोमीटर वाहन चालल्यानंतर अलायमेंट व बॅलंन्सिंग करणे आवश्यक असते. अन्यथा वाहनाचे टायर मार खातात.पण, आता सर्वच बंद असल्याने अलायमेंट व बॅलंसिंग करता येत नाही. परिणामी वाहनाचालकाला त्याचा फटका बसणार आहे. सोबतच आमची दुकाने बंद असल्याने आमच्याही रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
माणिकचंद बारई, व्यावसायिक
वाहनाचे नियमित अलायमेंट, बॅलंन्सिंग आणि सर्व्हिसिंग केले तर वाहनांचा अॅव्हरेजही चांगला असतो. त्यामुळे वाहनचालवितांनाही काही अडचण जात नाही. पण, आता सर्वच बंद असल्याने वाहनांची सर्व्हिसिंग थांबले आहे. परिणामी अॅव्हरेजही घटला आहे. वाहन चालूच राहिले तर वाहनांच्या आयुर्मानावर परिणाम होईल आणि बंद ठेवले तर रोजीरोटीचा प्रश्न आहे.
सुुहास वानखेडे, वाहन मालक