पुलाच्या बांधकामात गैरप्रकाराचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:47 PM2018-01-06T23:47:30+5:302018-01-06T23:47:44+5:30
निम्न वर्धा प्रकल्प कालव्याच्या पुलाचे बांधकाम सालोड-पडेगावच्या मुख्य रस्त्यावर करण्यात येत आहे. सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याची ओरड सालोड पडेगाव येथील नागरिकांची आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : निम्न वर्धा प्रकल्प कालव्याच्या पुलाचे बांधकाम सालोड-पडेगावच्या मुख्य रस्त्यावर करण्यात येत आहे. सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याची ओरड सालोड पडेगाव येथील नागरिकांची आहे.
सदर पुलाचे बांधकाम लोकल रेती वापरून केले जात आहे. सदर गैरप्रकार सालोड-पडेगाव या दोन्ही गावांच्या नागरिकांच्या निदर्शनास आले. यामुळे दोन्ही गावातील नागरिकांनी बांधकामाचे स्थळ गाठून अभियंत्यांना या भोंगळ कारभाराची सूचना केली. सदर सूचना लक्षात घेऊन तात्पुरते काम बंद केले; परंतु झालेल्या कामात जो गैरप्रकार झाला. याचे काय करायचे असाही प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. यावेळी अभियंते निरूत्तर झाले.
सदर बांधकाम तळापासूनच लोकल रेतीनी करत असल्यामुळे सदर रस्त्याने ये-जा करणाºयांनी बांधकामावर शंका घेत होते व कामगारांना हटकत होते; पण त्याचे ऐकूण न घेता बांधकाम सुरूच असल्याचे दिसून आले.
माझी चुकी झाली. माझ्या पश्चात लोकल रेती वापरण्यात आली. यापुढे वर्धा नदीचीच रेती वापरायला लावतो.
- ग.म. गुगल, अभियंता, निम्न प्रकल्प, वर्धा
मी दररोज वर्धा ते पडेगाव ये-जा करतो. या पुलाचे बांधकाम तळापासूनच माती मिश्रीत (लोकल) रेती वापरून करीत असल्याचे दिसत आहे. यामध्ये मोठा गैरप्रकार होत असावा, असे मला वाटते.
-गौरव शेंडे, नागरिक, पडेगाव
असे बोगस काम होऊ देणार नाही. अशा बोगस कामाचा फटका आम्हा शेतकºयांनाच बसणार आहे. काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे व वर्धा नदीची रेती वापरून करावे.
- नरेंद्र पहाडे, उपसरपंच, पडेगाव