आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना किसान विकासपत्र व शिलाई मशीनचे वाटप
By admin | Published: April 2, 2016 02:35 AM2016-04-02T02:35:40+5:302016-04-02T02:35:40+5:30
वर्धा लोकसभा मतदार संघातील शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवांना तसेच त्यांच्या वारसांना किसान विकासपत्र तसेच शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
सामाजिक उपक्रम : शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलीला दत्तक घेणाऱ्या जावंधिया दाम्पत्याचा सत्कार
देवळी : वर्धा लोकसभा मतदार संघातील शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवांना तसेच त्यांच्या वारसांना किसान विकासपत्र तसेच शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. एका विशेष कार्यक्रमात खासदार रामदास तडस यांच्या हस्ते सदर वाटप करण्यात आले.
याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने तर अतिथी म्हणून खासदार रामदास तडस, नगराध्यक्ष शोभा तडस, माजी आमदार अरूण अडसड, माजी आमदार दादाराव केचे, नागरी बँकेचे अध्यक्ष अनिल जोशी, धामणगाव बाजार समितीचे सभापती मोहन इंगळे, डॉ. शिरीष गोडे आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी वर्धा लोकसभा मतदार संघातील ४० शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना प्रती ५ हजाराचे किसान विकासपत्र तसेच शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
यावेळी संध्या पुसदेकर, प्रणाली देवारे, सुलोचना मोडक, नंदा मुनेश्वर, रेश्मा तेलंग, रामभाऊ राऊत, महेंद्र मोहिजे यांना शिलाई मशिनचे तर शरद डहाके, कल्पना पारधी, उमा तायडे, पद्मा जावंधिया, सुभद्रा मांढरे, पद्मा उईके, अजय खापरीकर, मीनाक्षी घोडे, मीना येडांगे, रत्ना सारण, शोभा ढोके, जीजाबाई, अशोक दांडेकर, अल्का गणगणे, विजया पेठे, विठ्ठल महाकाळकर, सुनंदा गडकरी, बेबी हिवरकर, मंगेश पोटफुले, मनिषा भावरकर, शोभा लोणारे, विनोद काकडे, घनश्याम उंबरकर, सुशिला पांडे, मारोतराव काकडे, पुष्पा देशमुख, अल्का भगत, आदींना किसान विकासपत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी खा. तडस म्हणाले, आयुष्यात अनेक आंदोलने केली, संघर्ष केला. शेतकरी, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी प्रसंगी कारागृहात गेलो. त्यामुळे कार्यकर्ते हेच माझी पुुंजी राहिली आहे. तळागाळाच्या माणसाला मोठे करण्याचे काम भाजपाने केले आहे. चहा विकणाऱ्या माणसाला देशाला पंतप्रधान केले. माझ्या सारख्या सामान्य माणसाला खासदार केले. या परिसराचा लोकप्रतिनिधी म्हणून १० शेतकऱ्यांची निवड करून त्यांचे कर्ज माफ करण्याची जबाबदारी मी स्वत: पेलणार असल्याचे ते म्हणाले. इतरांची दु:खे जाणून घेणारा तळागाळातील नेता म्हणून खासदार तडस यांनी ओळख राहिली आहे असे विचार माजी आमदार अडसड यांनी व्यक्त केले. माजी आमदार केचे व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनीही मनोगत व्यक्त केले.
शेतकरी आत्महत्याग्रस्त महिला भावना शरद डहाके यांच्या ७ महिन्याच्या मुलीला दत्तक घेतल्याबद्दल गिरीराज जावंधिया व रिना जावंधिया या जोडप्याचा अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक भाजपाचे तालुका अध्यक्ष दीपक फुलकरी यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन समीर ढोक यांनी तर आभार नगरसेवक राहुल चोपडा यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला न. प. उपाध्यक्ष विजय गोमासे, मुकेश भिसे, जि.प. सदस्य किशोर मडावी, जयंत येरावार, कृष्णकांत शेंडे, बंडू जोशी, चंदू ठाकरे, तसेच भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. शहरातील नागरिकाम्ची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.(प्रतिनिधी)