आकस्मिक मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदतीचे वाटप

By Admin | Published: July 17, 2016 12:31 AM2016-07-17T00:31:25+5:302016-07-17T00:31:25+5:30

अकस्मात व अपघाती मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री व शासकीय योजनेतून मदत केली जाते.

Allotment of government aid to the families of casualties | आकस्मिक मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदतीचे वाटप

आकस्मिक मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदतीचे वाटप

googlenewsNext

सेलू : अकस्मात व अपघाती मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री व शासकीय योजनेतून मदत केली जाते. तालुक्यातील अशा पात्र कुटुंबीयांना या शासकीय मदतीचा धनादेश शनिवारी वितरित करण्यात आला.
रेहकी येथील सुजाता अरगडे हिचा वीज पडून तसेच रेहकी (कला) येथील संजय धुर्वे व घोराड येथील राहुल राजू जाधव यांचा अपघाती मृत्यू झाला होता. मृतक सुजाता अरगडे हिच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत करण्यात आली. मृतक संजय धुर्वे व राहुल जाधव यांच्या कुटुंबीयांना प्रत्येक एक लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री निधीतून मंजूर करण्यात आली होती.
आ. डॉ. भोयर यांच्या हस्ते मृतक सुजाता अरगडे हिचे वडील राजेंद्र अरगडे यांना चार लाख रुपयांचा तसेच मृतक संजय धुर्वे यांचा मुलगा व सुनील धुर्वे यांना एक लाख रुपये मदतीचा धनादेश सेलू येथील विश्रामृहात आयोजित कार्यक्रमात देण्यात आला. शिवाय मृतक राहुल जाधव यांच्या घोराड येथील घरी जाऊन आ. भोयर यांनी त्याचे वडील राजू जाधव यांना एक लाख रुपयांचा मदतीचा धनादेश प्रदान केला.
यावेळी भाजपाचे तालुका प्रमुख अशोक कलोडे, सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास वरटकर, भाजयुमोचे तालुका अध्यक्ष विकास मोटंमवार, भाजयुमोचे कोषाध्यक्ष राजू झाडे, चारमंडळचे सरपंच फुलचंद चव्हाण, भाजयुमोचे चिटणीस आशीष कोटमकर, संजय गांधी निराधार योनजेचे अध्यक्ष हरिष पारसे, मारोती धुर्वे, मंडळ अधिकारी डेहणे, सहारे, अरगडे, तलाठी सुनील चन्नूरवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
अकस्मात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना शासकीय सांत्वना प्राप्त झाल्याने समाधान व्यक्त केले.(तालुका प्रतिनिधी)

 

Web Title: Allotment of government aid to the families of casualties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.