युवतीचा पाणीदार गावासाठी एकाकी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 09:57 PM2019-05-18T21:57:58+5:302019-05-18T21:58:33+5:30
सेलू तालुक्यात अनेक गावांत लोक गाव पाणीदार बनविण्यासाठी श्रमदान करीत असताना अस ही एक गाव आहे ज्या गावातील नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली असताना एक युवतीने गाव पाणीदार बनविण्यासाठी एकाकी लढा देत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : सेलू तालुक्यात अनेक गावांत लोक गाव पाणीदार बनविण्यासाठी श्रमदान करीत असताना अस ही एक गाव आहे ज्या गावातील नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली असताना एक युवतीने गाव पाणीदार बनविण्यासाठी एकाकी लढा देत आहे.
हिंगणी ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या जंगल व्याप्त भागात वानरविहिरा हे एक गाव. आपले ही गाव पाणीदार व्हावे अशी खूणगाठ मनाशी बाळगून स्वत: गावातील नागरिकांना श्रमदानाच महत्त्व पटवून दिले पण कोणीही पुढाकार घेत नाही म्हणून याच गावातील युवती प्रिया नेहारे हिने एकटीने प्रथम श्रमदानास सुरूवात केली काही दिवस ती एकटीच श्रमदान करीत होती. १८०० घनमीटर श्रमदानाच उद्दिष्ट पूर्ण होणार नाही याची कल्पना तिला आली कोणीही तिला साथ दिली नाही पण ती एकटीच श्रमदान करीत असल्याचे सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणारे वीर भगतसिंग बहुद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कळले आणि त्यांनी वानरविहिरा गावाकडे धाव घेतली संस्थेचे पदाधिकारी तिच्या मदतीला रोज सकाळी जाऊन श्रमदान करीत आहे त्याच बरोबर काही विविध युवा संघटनाही सहभागी होऊ लागल्या ते गाव पाणीदार होईलच असा आत्मविश्वास आता प्रियाला येऊ लागला त्या युवतीच्या कार्याची दखल सोशल मीडियाने घेतली तिचे अभिनंदन होत आहे.
महिलांचा पुढाकार
पावसाचे पाणी मुरवून गाव कायमस्वरूपी पाणीदार बनविण्यासाठी जिल्ह्यातील अनेक गावात स्पर्धा लागली आहे. या कामात तरूणींचा सहभाग मोठा असल्याचे दिसून येत आहे. गावात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही श्रमदानासाठी सरसावल्या आहेत. वर्धा येथील सामाजिक संघटनांचे पदाधिकारी काही गावांना आर्थिक मदत देत आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या कामात गावकऱ्यांचा उत्साह सतत वाढत आहे. प्रियाला सध्या वानरविहिराची वाघीण अशी उपमा दिली आहे.