आधीच सिलिंडर हजाराच्या घरात; घरपोचसाठी वेगळी लूट कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 05:00 AM2021-09-11T05:00:00+5:302021-09-11T05:00:22+5:30

कोरोनाकाळातील आर्थिक फटका सहन करत असतानाच महागाईचा मारही बसत आहे. यामध्ये अत्यावश्यक असलेल्या गॅस सिलिंडरचे दरही दर महिन्याला २५ रुपयांनी वाढत आहेत. या सिलिंडरच्या दरवाढीने ग्राहकांच्या खिशावर दरोडाच घातला असून ते दर हजाराचा आकडा पार जाण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. अशातच एजन्सीमध्ये जाऊन सिलिंडर घेतल्यास मूळ दरात उपलब्ध होते. तर घरपोच आणून देण्याकरिता अतिरिक्त वीस रुपये आकारले जातात.

Already in the house of a thousand cylinders; Why a separate robbery for home delivery? | आधीच सिलिंडर हजाराच्या घरात; घरपोचसाठी वेगळी लूट कशाला?

आधीच सिलिंडर हजाराच्या घरात; घरपोचसाठी वेगळी लूट कशाला?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरी भागासोबतच ग्रामीण भागामध्येही गॅस सिलिंडर आता अत्यावश्यक झाला आहे. सणासुदीचे दिवस असतानाच या महिन्याच्या सुुरुवातीलाच सिलिंडरची २५ रुपयांनी दरवाढ झाली असून ग्राहकांना ९३६.५० रुपयांमध्ये सिलिंडर विकत घ्यावे लागत आहे. सध्या सिलिंडर हजारांच्या घरात पोहचली असतानाही काही डिलिव्हरी बॉयकडून सिलिंडर घरपोच आणून देण्याकरिता वीस रुपये अतिरिक्त घेतले जात असल्याची ओरड होत आहे. त्यामुळे ही अतिरिक्त लूट कशाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनाकाळातील आर्थिक फटका सहन करत असतानाच महागाईचा मारही बसत आहे. यामध्ये अत्यावश्यक असलेल्या गॅस सिलिंडरचे दरही दर महिन्याला २५ रुपयांनी वाढत आहेत. या सिलिंडरच्या दरवाढीने ग्राहकांच्या खिशावर दरोडाच घातला असून ते दर हजाराचा आकडा पार जाण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. अशातच एजन्सीमध्ये जाऊन सिलिंडर घेतल्यास मूळ दरात उपलब्ध होते. तर घरपोच आणून देण्याकरिता अतिरिक्त वीस रुपये आकारले जातात. ही शहरातील स्थिती असून ग्रामीण भागातील परिस्थिती यापेक्षा वेगळीच आहे. 
ग्रामीण भागात तर सिलिंडरवर शंभर ते दीडशे रुपये अतिरिक्त घेतले जात असल्याची ओरड होत आहे.

वर्षभरात २०० रुपयांची वाढ

सिलिंडरची दरमहा २५ रुपयांनी वाढ होतांना दिसत आहे. जानेवारी महिन्यांमध्ये ७४६ रुपयांत मिळणारे सिलिंडर सप्टेंबर महिन्यात ९३६.५० रुपयांमध्ये विकत घ्यावे लागत आहे. यावर्षी जानेवारी महिन्यापासून जवळपास १९० रुपयांनी दरवाढ झाली आहे. सर्वाधिक दरवाढ मार्च महिन्यात झाली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीत दर कायम असताना मार्चमध्ये एकदम १०० रुपयांची वाढ झाली. त्यानंतर दरमहा २५ रुपयांची दरवाढ सुरु आहे.

डिलिव्हरी बॉयला वेगळे २० रुपये कशासाठी?

सिलिंडरचा वापर नित्याचाच झाल्याने सिलिंडरचे दर वाढले तरीही सिलिंडर विकत घ्यावेच लागते. एजंन्सीतून सिलिंडर आणले तर पावतीवर असलेले दरच आकारले जाते. परंतु घरपोच सिलिंडर आणण्याकरिता डिलिव्हरी बॉयकडून अतिरिक्त वीस रुपये घेतले जाते. या वीस रुपयांची कोणतीही पावती दिली जात नाही.
- सारिका कडू, गृहिणी

सिलिंडरचे दर दरमहिन्याला वाढत असून महिन्याचे बजेट कोलमडले आहे. आता सिलिंडर हजार रुपयांच्या घरात असताना घरपोच आणण्याकरिता डिलिव्हरी बॉयकडून वीस रुपये अतिरिक्त घेतले जातात. याची विचारणा केली असता ते द्यावेच लागतात असे सांगतात. याकडे एजंन्सीच्या संचालकांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.
- देवश्री चव्हाण, गृहिणी
 

वितरक काय म्हणतात?

सिलिंडरच्या किंमती दर महिन्याला वाढत आहे. अजुनही सिलिंडरचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुसार ग्राहकांच्या नावाने फाडलेल्या पोच पावतीवर जितकी रक्कम लिहिली असेल तेवढीच रक्कम डिलिव्हरी बॉयला देणे आवश्यक आहे. काही ठिकाणी ग्राहकांकडून वरच्या माळ्यावर सिलिंडर पोहचवून मागितले जाते, अशा वेळी काही डिलिव्हरी बॉय अतिरिक्त पैसे घेत असतीलही. परंतु आम्ही सिलिंडरच्या किंमती शिवाय अतिरिक्त पैसे आकारत नाही, असे वितरकांकडून सांगण्यात आले आहे.

 

Web Title: Already in the house of a thousand cylinders; Why a separate robbery for home delivery?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.