20 जणांनी लाच घेतली तरी खुर्ची अद्यापही कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 05:00 AM2021-12-13T05:00:00+5:302021-12-13T05:00:16+5:30

लाचलुचपत विभागाकडून अनेकदा लाच न देण्यासाठी व घेण्यासाठी जनजागृती केली जाते. मात्र, अनेक जण कामे लवकर करण्यासाठी किंवा प्रकरण दाबण्यासाठी लाचेची रक्कम स्वीकारतात. लाच मागणाऱ्यांकडून कामे अडकवून ठेवली जाते. परिणामी, संबंधित व्यक्तीला लाच द्यावीच लागते. भ्रष्टाचाराची ही कीड मोडून काढण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. मागील काही वर्षांत या विभागाने लाचखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कारवाई करीत बेड्या ठोकल्या.

Although 20 people took bribes, the chair is still there! | 20 जणांनी लाच घेतली तरी खुर्ची अद्यापही कायम!

20 जणांनी लाच घेतली तरी खुर्ची अद्यापही कायम!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लाच देणे आणि घेणे हा गुन्हा असतानाही अनेक अधिकारी, कर्मचारी  झटपट कामे करण्यासाठी लाचेची मागणी करतात आणि नागरिक त्याला लाचही देतात. मात्र, अशांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई केल्या जात असून, मागील तीन वर्षांत २० लाचखोरांवर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात आले. मात्र, न्यायालयाच्या निकालाच्या प्रतीक्षेत असल्याने अद्याप कुणालाही बडतर्फ करण्यात आले नसल्याने आजही त्यांची खुर्ची कायम असल्याचे दिसून येत आहे. 
लाचलुचपत विभागाकडून अनेकदा लाच न देण्यासाठी व घेण्यासाठी जनजागृती केली जाते. मात्र, अनेक जण कामे लवकर करण्यासाठी किंवा प्रकरण दाबण्यासाठी लाचेची रक्कम स्वीकारतात. लाच मागणाऱ्यांकडून कामे अडकवून ठेवली जाते. परिणामी, संबंधित व्यक्तीला लाच द्यावीच लागते. भ्रष्टाचाराची ही कीड मोडून काढण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. मागील काही वर्षांत या विभागाने लाचखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कारवाई करीत बेड्या ठोकल्या. मात्र, या वर्षात केवळ दोनच कारवाई झाल्याने या विभागाला आज बुस्टर देण्याची गरज निर्माण झाली आहे.  २०१९ ते २०२१ या तीन वर्षांच्या कालावधीत तब्बल २० लाचखोर एसीबीच्या गळाला लागले आहेत. 
२०१९ मध्ये १० लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. तर २०२० मध्ये ८ लाचखोर पोलिसांच्या गळाला लागले. मात्र, २०२१ मध्ये केवळ २ सापळे यशस्वी झाले असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली आहे. २०१९ पासूनच्या प्रकरणात अजूनही न्यायालयाने निकाल दिला नसल्याने लाचखोरांना निलंबित केले असून, अजूनही त्यांची खुर्ची कायम असून त्यांना बडतर्फ करण्यात आलेले नाही. त्यामुळे अशांवर तत्काळ कारवाई करण्यासाठ त्यांना बडतर्फ करण्याची गरज निर्माण झाली आहे. असे दिसून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बडतर्फ करण्याचा मुहूर्त सापडेना
-   लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील तीन वर्षांत केलेल्या कारवाईत तब्बल २० लाचखोरांना अटक केली असून, त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. मात्र,
-   आरोपींना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई ही त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात शिक्षा लागल्यावर केली जाते. अद्याप २०१९ ते २०२१ पर्यंत दाखल गुन्ह्यांत कोर्टाने निकाल दिलेला नसल्याने आरोपींवर नोकरीतून काढण्याची वा बडतर्फ करण्याची कारवाई झालेली नाही.

कुणी लाच मागितली तर साधावा संपर्क...
-   लाच घेणे व देणे दोन्ही गुन्हा आहे. कुणी जर कायदेशीर कामासाठी, शासकीय, निमशासकीय अधिकारी तसेच कर्मचारी आपणास शासकीय फी व्यतिरिक्त लाच मागत असल्यास किंवा शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना कुणी बेकायदेशीर काम करण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न करीत असल्यास मुख्य पोस्ट ऑफिस चौकातील बीएसएनएल ऑफिससमोर असलेल्या लाचलुचपत विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा १०६४ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करावा. 

लाचखोरीत महसूल नंबर वन, पोलीस तळाला
२०१९ ते २०२१ या तीन वर्षांचा विचार करता लाचखोरी संबंधाने सापळा कारवाई झालेल्या विभागांपैकी महसूल विभाग, वनविभाग, शिक्षण विभाग आणि गृहविभाग आघाडीवर असल्याचे झालेल्या कारवाईवरून दिसून आले आहे.

 

Web Title: Although 20 people took bribes, the chair is still there!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.