वंचितांच्या उत्थानासाठी गांधी - आंबेडकरांचे योगदान महत्त्वाचे - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 07:21 PM2018-01-30T19:21:22+5:302018-01-30T19:24:46+5:30

इतिहास चांगल्या वा वाईट कामाची नोंद ठेवत असतो. पण इतिहासात चुकीच्या बाबींचा अंतर्भाव झाल्याचे दिसते. गांधीजी आणि बाबासाहेबांच्या कार्याचा विचार केल्यास दोघांचेही मिशन एकच होते..

Ambedkar's contributions to the rise of the Gandhis - Prakash Ambedkar | वंचितांच्या उत्थानासाठी गांधी - आंबेडकरांचे योगदान महत्त्वाचे - प्रकाश आंबेडकर

वंचितांच्या उत्थानासाठी गांधी - आंबेडकरांचे योगदान महत्त्वाचे - प्रकाश आंबेडकर

googlenewsNext

सेवाग्राम (वर्धा) :  इतिहास चांगल्या वा वाईट कामाची नोंद ठेवत असतो. पण इतिहासात चुकीच्या बाबींचा अंतर्भाव झाल्याचे दिसते. गांधीजी आणि बाबासाहेबांच्या कार्याचा विचार केल्यास दोघांचेही मिशन एकच होते. त्या काळात दोघांत वाद होता, पण संवाद कधीच थांबला नाही. त्याकाळी शोषित, पीडित, वंचितांच्या उत्थानासाठी त्यांनी कार्य केले. म्हणून महात्मा गांधी आणि आंबेडकरांचे योगदान महत्त्वपुर्ण असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘गांधी आंबेडकर मुक्त चिंतन’ या विषयावर व्यक्त केले. 

सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७० व्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच दक्षिणायन चळवळीच्या समास २०१८ या अभियानात सेवाग्राम ते दीक्षाभूमी अभियानाचा यावेळी प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी तर प्रमुख वक्ता म्हणून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, राजमोहन गांधी, पद्मश्री डॉ. गणेश देवी, आ. आशिष देशमुख, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, महाराष्ट्र भूदान मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ विरूळकर, मा.म. गडकरी, उषा गांधी व सरपंच रोशना जामलेकर उपस्थित होते. मान्यवरांचे खादी शाल सुतमाळ व ग्रंथ देवून स्वागत करण्यात आले.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, परिस्थिती का बदलली. विरोध करायला त्याकाळी हिंदु महासभा, रा.सं. सेवक संघ होतेच. आज पण यासह विविध गट निर्माण झालेले आहे. आज दलितांसह बहुजन वर्गात शक्तीसह चेतना निर्माणाचे काम करावे लागेल. समाजातील कथीत ठेकेदारांच्या विरूद्ध वंचितांना उतरवावे लागेल. दोघांनी वंचितांना व्यवस्थेचा भाग बनविले. वर्णव्यवस्था नाकारल्याने दोघांचेही विचार व कार्य एकच असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

सज्जनाचे आंदोलन नाही म्हणून दुर्जनाची शक्ती वाढल्याचे प्रतिपादन न्या. धर्माधिकारी यांनी केले. गांधी आंबेडकरांचे आंदोलन अहिंसेवर आधारित होते. पुणे कराराच्या अनुषंगाने पुण्यात दोघांचा पुतळा उभारला पाहिजे. शाळा मंदिर वैभवशाली झाली आहे. समाज परिवर्तनाचे प्रवासी बनून राष्ट्र निर्माणाचे काम करण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. गणेश देवी यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक जयवंत मठकर यांनी केले तर संचालन आणि उपस्थितांचे आभार मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव यांनी मानले. प्रारंभी वैष्णव जन तो, हे भजन आनंद निकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. हे नम्रता के सागर, या प्रार्थनेने ेसमारोप झाला. आश्रमाच्या इतिहासाची माहिती मार्गदर्शक संगिता चव्हाण यांनी दिली. स्वागत कामगार जयश्री पाटील व पांडुरंग थुल यांनी केले. बापूंना सर्वांनी उभे राहून आदरांजली वाहिली.

धर्माचे राजकारण धोकादायक - राजमोहन गांधी

च्याप्रसंगी राजमोहन गांधी म्हणाले, धर्माचे राजकारण धोकादायक बनले आहे. १९४८ ला महात्मा गांधी तर १९५६ ला बाबासाहेब आम्हाला सोडून गेले.  गांधीजींच्या हत्येपासून हत्यासत्र सुरू असल्याचे दिसते. देशाला स्वातंत्र्य मिळाले पण खºया अर्थाने विचारांचे स्वातंत्र्य कुठे आहे. गांधींचा आदर आहे. पण ईश्वर अल्ला असे म्हणणे ते आता कुठे दिसत नाही. दोघात विरोध, वाद होता पण संवाद थांबला नाही. ते तत्वावर चालणारे होते. देश संविधानावर चालवा, असेही ते म्हणाले. 

Web Title: Ambedkar's contributions to the rise of the Gandhis - Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.