महात्मा गांधी पुतळ्याजवळ अमित शहा यांचा निषेध
By admin | Published: June 14, 2017 12:54 AM2017-06-14T00:54:06+5:302017-06-14T00:54:06+5:30
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महात्मा गांधींना ‘चतुर बनिया’ असे संबोधित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महात्मा गांधींना ‘चतुर बनिया’ असे संबोधित केले. यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मौन पाळून नागरिकांनी निषेध नोंदविला.
महात्मा गांधी यांच्याबाबत चतुर बनिया, असा अमित शहा यांच्याकडून उल्लेख केला गेला होता. त्यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. महात्मा गांधींचा उल्लेख एकेरी भाषेत करण्यात आल्याच्या विरोधात येथील संतप्त नागरिकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ एकत्र येत सामूहिक निषेध नोंदविला.
याप्रसंगी नागरिकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला हारार्पण करून ‘ते’ आमच्याकरिता आणि जगाकरिता आदर्श तसेच आदरनिय आहेत, असा यातून संदेश देण्यात आला. अशा आदर्शाला वारंवार ‘अहंकारी व्यक्ती’ असा एकेरी भाषेचा उपयोग करून महात्मा गांधींचा अनादर करण्याचा प्रयत्न करीत असून ‘या’ व्यक्तीचा नव्हे तर अशा प्रवृत्तीचा जोरदार निषेध करणे आता गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. हा गांधीजींचा अपमान नसून संपूर्ण देशाचा अपमान असल्याची मतेही यावेळी नागरिकांनी व्यक्त केलीत.
निषेध कार्यक्रमाला रमेश झाडे, धनंजय बकाने, समीर पांढरे, अभिजीत डाखोरे, राजेश शेंडे, नरेंद्र पोहनकर, कदीर बक्ष, अमोल बोरकर, लिलाधर मडावी, हमीद रझा शेख, सुरेश चौधरी, सुनील भुते, गजानन कलोडे, अमोल मुडे, सुभाष निनावे, राजू मुडे, सनी वासनवार, केशव तितरे, दिनेश हिवंज, गजानन साटोणे, आशिष भोयर, प्रवीण काटवले, उत्तम पोहाणे यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.