अमरावतीची वैष्णवी भालेराव 'स्वरवैदर्भी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 11:26 PM2017-09-04T23:26:49+5:302017-09-04T23:27:10+5:30

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित 'स्वरवैदर्भी लिटिल चॅम्प' ....

Amravati's Vaishnavi Bhalerao 'Swavadvadarhi' | अमरावतीची वैष्णवी भालेराव 'स्वरवैदर्भी'

अमरावतीची वैष्णवी भालेराव 'स्वरवैदर्भी'

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूरची श्रीया मेंढी, सुमेधा बालपांडे व अवंतिका ढुमणे उपविजेत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित 'स्वरवैदर्भी लिटिल चॅम्प' विदर्भस्तरीय सिनेगीत गायन महाअंतिम स्पर्धेचे विजेतेपद अमरावतीच्या वैष्णवी भालेराव हिने पटकावले. १६ वषार्खालील बालकुमारांच्या या स्पर्धेची उपविजेता नागपूरची श्रीया मेंढी ठरली. तृतीय पुरस्काराचा सन्मान सात वर्षाची सुमेधा बालपांडे (नागपूर) आणि अवंतिका ढुमणे (वर्धा) या बालगायिकांना प्राप्त झाला.
सावंगीच्या विद्यापीठ सभागृहात आयोजित या महाअंतिम स्पर्धेचे उदघाटन कुलपती माजी खासदार दत्ता मेघे यांच्या हस्ते झाले. यावेळी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे प्रकुलपती आनंदवर्धन शर्मा, शरद पवार दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक पखान उपस्थित होते. महाअंतिम स्पर्धा जुनी लोकप्रिय गाणी, एकविसाव्या शतकातील गाणी आणि मराठी लोकधारा अशा तीन फेºयात घेण्यात आली.
संस्थेच्या विश्वस्त शालिनी मेघे, द.मे. आयुर्विज्ञान संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर इंगळे, व्ही. आर. मेघे, सावंगी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाबाजी घेवडे, स्वरवैदभीर्चे संयोजक संजय इंगळे तिगावकर, सहसंयोजक सुनील राहाटे, परीक्षक गण नरेंद्र माहुलकर, संजय नाशिरकार, केतकी कुळकर्णी, अविनाश काळे, शशिकांत बागडदे, भारती भांडे-कदम यांच्या हस्ते 'स्वरवैदर्भी' सन्मानचिन्हासह रोख पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सर्व स्पर्धकांना गौरविण्यात आले.
स्पर्धेतील गायकांना शैलेश जगताप, चारू साळवे, दिनेश गवई, राजेंद्र झाडे, रवी ढोबळे, रितेश गुजर, निखिल झिरकुंटलवार यांनी उत्कृष्ट संगीतसाथ केली. संपूर्ण स्पर्धेचे संचालन मुबारक मुल्ला यांनी केले. या आयोजनात संगीता इंगळे, देवेंद्र गुजरकर, राजेश सव्वालाखे, पंकज अडेकर, राहुल तेलरांधे, हेमंत पुंडकर, सागर खोडे, विजय खैरे यांचे सहकार्य लाभले.
नऊ जणांना प्रोत्साहनपर पुरस्कार
प्रथम द्वितीय आणि तृतीय पुरस्काराशिवाय उन्मेषा वानखडे (अकोला), देवश्री चिमोटे, निधी गायकवाड (अमरावती), दिव्या शेंडे (कळंब यवतमाळ), अनुराग जाधव (कारंजा लाड), देवांश दुपारे, प्रांजल धोटे, मिताली कोहाड, स्वप्नमोय चौधरी (नागपूर) या बालकुमार गायकांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला.

Web Title: Amravati's Vaishnavi Bhalerao 'Swavadvadarhi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.