अन् जिल्हाधिकारी धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 09:25 PM2019-05-02T21:25:42+5:302019-05-02T21:26:23+5:30

भरधाव कार अनियंत्रित होत रस्त्याच्याकडेला जात उलटली. वाहन उलटल्याचे लक्षात येताच आर्वी तालुक्यातील काही गावांच्या दौऱ्यावर असलेल्या जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी आपले वाहन थांबविले.

And the collector helped the victims of the accident | अन् जिल्हाधिकारी धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

अन् जिल्हाधिकारी धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

Next
ठळक मुद्देआजनगाव शिवारात उलटली कार : दोघेही जखमी पोलीस उपनिरीक्षक

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भरधाव कार अनियंत्रित होत रस्त्याच्याकडेला जात उलटली. वाहन उलटल्याचे लक्षात येताच आर्वी तालुक्यातील काही गावांच्या दौऱ्यावर असलेल्या जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी आपले वाहन थांबविले. त्यांनी तातडीने इतर अधिकाऱ्यांच्या व परिसरातील नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्यांना वाहनाबाहेर काढून शासकीय वाहनाने खरांगण्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. ही घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्यासुमारास खरांगणा नजीकच्या आजणगाव शिवारात घडली.
जिल्हाधिकारी विवेक भिमनवार आणि जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे अधिकाºयांनी वॉटर कपच्या निमित्ताने खरांगणा परिसरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या श्रमदान कार्यक्रमाला भेट दिल्यानंतर महाकाळी येथील ‘धाम’ गाळमुक्तच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी व इतर अधिकाºयांचा ताफा वर्धेच्या दिशेने जात असता एम.एच.३४ ए.एम. ७५५७ क्रमांकाची कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटल्याचे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने त्यांच्या वाहनचालकाला वाहन थांबविण्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी स्वत: वाहनाखाली उतरुन इतर अधिकाºयांसह परिसरातील नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त कारमध्ये अडकलेल्या यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मंगेश भोयर आणि पांढरकवडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक राहूल किटे यांना वाहनाबाहेर काढले. अर्जून ढेंगरे व जिल्हाधिकारी यांच्या वाहनाचे चालक यांनी अपघातग्रस्त वाहनाच्या मागील काचा फोडून दोन्ही जखमींना वाहनाबाहेर काढल्यानंतर वर्धा पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता एस. बी. काळे यांच्या वाहनाने जखमींना तातडीने खरांगणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. माहिती मिळताच खरांगणा (मो.)चे ठाणेदार संतोष शेगावकर व त्यांच्या चमुने घटनास्थळ गाठले. या अपघाताची नोंद खरांगणा पोलिसांनी घेतली आहे.

Web Title: And the collector helped the victims of the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.