पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांना भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 05:00 AM2020-12-24T05:00:00+5:302020-12-24T05:00:16+5:30

पॅसेंजर रेल्वेगाड्यांमधून जास्तीत जास्त गरीब प्रवासी प्रवास करताना दिसतात. प्रवासभाडे कमी असल्याने सवारी गाड्यांमधून प्रवास करताना दिसतात. मात्र, सध्या पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने गरीब प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून चांगलाच आर्थिक फटका बसत आहे. पॅसेंजर गाड्या अभावी गरीब प्रवाशांची होरपळ होत असल्याचे चित्र बघावयास मिळत असून वेळीच पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू झाल्यास सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळेल.

Up-and-down passengers are stranded as passenger trains are closed | पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांना भुर्दंड

पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांना भुर्दंड

Next
ठळक मुद्देकेवळ विशेष रेल्वेगाड्याच सुरू

  लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यातील सर्व रेल्वेस्थानकाहून केवळ कोविड विशेष रेल्वेगाड्या धावतात. त्यातही आरक्षण असल्याशिवाय रेल्वेगाडीत बसता येत नसल्याने अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच होरपळ होत असून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. 
वर्धा रेल्वेस्थानक हे जंक्श्न असल्याने या स्थानकावरुन मोठ्याप्रमाणात रेल्वेगाड्या धावतात. सध्या वर्धा रेल्वेस्थानकावरुन अप आणि डाऊन मार्गावर ३६ कोविड स्पेशल ट्रेन धावत आहेत. मात्र, वर्धा येथून पुलगाव, धामणगाव, हिंगणघाट, सेलू रोड, बडनेरा आदी ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी गाड्या बंद केल्याने बाहेरगावी शिक्षण घेणारे, नोकरीवर असणारे तसेच विविध शासकीय कार्यालयासह बॅंकेत काम करणाऱ्यांसह गोरगरीबांची होरपळ होत असून जादा प्रवासभाडे देवून त्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. यात सर्वसामान्य प्रवाशांचे कंबरडे मोडत असल्याने  पॅसेंजर सुरु करण्याची मागणी आहे.

पुणे, मुंबई रेल्वेगाड्या सुरू 
सध्या ३६ स्पेशल गाड्या वर्धा रेल्वेस्थानकावरून धावतात. त्यामध्ये विर्दर्भ एक्सप्रेस, मेल एक्सप्रेस, नागपूर ते पुणे एक्सप्रेस आदी रेल्वेगाड्या धावतात. मात्र, या गाड्यांमध्ये आरक्षण असल्याशिवाय बसता येत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे.

नागपूर-भूसावळ-नागपूर पॅसेंजर गाडी बंदच
नागपूर ते भूसावळ तसेच भूसावळ ते नागपूर, नागपूर ते बल्लारशाह आदी  ६ प्रवासी रेल्वेगाड्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही बंद आहे. त्या सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

रेल्वेत आरक्षणाविना प्रवासास बंदी आहे. एका सीटवर तीन प्रवासी असे धोरण असल्याने अप-डाऊन शक्य नाही. खासगी वाहनाने जास्त खर्च लागत असून पॅसेंजर गाड्या सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. 
- डॉ. नीलेश वाघ, अध्यक्ष प्रवासी संघटना. 
 
गरीब प्रवाशांसमोर आर्थिक संकट
पॅसेंजर रेल्वेगाड्यांमधून जास्तीत जास्त गरीब प्रवासी प्रवास करताना दिसतात. प्रवासभाडे कमी असल्याने सवारी गाड्यांमधून प्रवास करताना दिसतात. मात्र, सध्या पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने गरीब प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून चांगलाच आर्थिक फटका बसत आहे. पॅसेंजर गाड्या अभावी गरीब प्रवाशांची होरपळ होत असल्याचे चित्र बघावयास मिळत असून वेळीच पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू झाल्यास सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळेल.
 
Web Title: Up-and-down passengers are stranded as passenger trains are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.