अन् ती ‘लक्ष्मी’ झाली पालकांना नकोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:11 AM2018-09-08T00:11:33+5:302018-09-08T00:12:30+5:30
कुणाच्याही कुटुंबात मुलगा जन्माला येताच ‘वंशाचा दिवा’ असे म्हणत त्याचे कुटुंबात स्वागत कुटुंबिय करतात. तर मुलगी जन्माला येताच ‘लक्ष्मी’ अवतरली असे म्हणत तिचेही स्वागत काही कुटुंबिय करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कुणाच्याही कुटुंबात मुलगा जन्माला येताच ‘वंशाचा दिवा’ असे म्हणत त्याचे कुटुंबात स्वागत कुटुंबिय करतात. तर मुलगी जन्माला येताच ‘लक्ष्मी’ अवतरली असे म्हणत तिचेही स्वागत काही कुटुंबिय करतात. असे असलले तरी सध्याच्या विज्ञान युगात काही कठोर मनाचे पालक मुलगाच हवा असा अट्टाहास करती जन्मलेल्या मुलीला बेवारस सोडून देत असल्याची घटना वर्धा रेल्वे स्थानक परिसरात शुक्रवारी घडली. पालकांना नकोशी झालेली सुमारे चार महिन्यांची ही ‘लक्ष्मी’ (काल्पनीक नाव) एका प्रवाशाला दिसली. त्याने त्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना देताच तिला पोलिसांनी ताब्यात घेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
सविस्तर वृत्त असे की, नागपूर-अमरावती पॅसेंजर सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास वर्धा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर आली. यावेळी प्रवासी साहिल बावरे व कोमल वडांद्रे दोन्ही रा. सिंदी (रेल्वे) यांना याच रेल्वे गाडीत कपड्यात गुंडाळून असलेली सुमारे चार महिन्यांचे बाळ रडत असल्याचे निदर्शनास आले. या बाळाच्या आईचा त्यांनी शोध घेवूनही तीन न मिळाल्याने त्यांनी घटनेची माहिती वर्धा लोहमार्ग पोलिसांना दिली. माहिती मिळताच कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई विशाल मिश्रा यांनी आपल्या चमुसह घटनास्थळ गाठले. त्यांनी सदर बाळाला ताब्यात घेत पाहणी केली असता ती मुलगी असल्याचे पुढे आले. सुरूवातीला विचारपूस केल्यावरही सदर मुलीचे आई-वडील न मिळून आल्याने त्या मुलीला पोलिसांनी वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणले. तेथे भुकेने व्याकुळ असलेल्या ‘लक्ष्मी’ला वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्यातील महिला व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी पोटच्या मुलीगत प्रेम देत तिला बाटलीने दुध पाजले. जन्मदात्या आई-वडिलांना नकोशी झालेल्या ही ‘लक्ष्मी’ सुमारे तासभर पोलीस ठाण्यात राहिल्याने ती तेथील सर्वांना हवीहवीशीच वाटत होती. या तासभºयाच्या कालावधीत ती अनेक पोलीस कर्मचाºयांच्या खाद्यावर खेळली. त्यानंतर तिला लोहमार्ग पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मीला आधार देण्यासाठी लोहमार्ग पोलीस ठाण्यातील मनोज येळणे, धनराज नेवारे, विशाल मिश्रा, रेश्मा ठोंबरे, ज्योती नेवारे, जितेंद्र नितनवरे यांनी सहकार्य केले.
वर्धा रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक २ वर नागपूर-अमरावती पॅसेंजर आल्यावर एका सुजान प्रवाशाने याच रेल्वे गाडीत बेवारस स्थितीत सुमारे चार महिन्याचे एक बाळ आढळल्याची माहिती आम्हाला दिली. त्यावरून घटनास्थळ गाठून ते बाळ आम्ही ताब्यात घेतले. ती मुलगी आहे. भुकेने व्याकुळ असलेल्या सदर मुलीला बाटलीने दुध पाजल्यानंतर तिला आम्ही जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मुलीच्या आई-वडिलांचा शोध आम्ही घेत आहो.
- सविता मेश्राम, महिला पोलीस नाईक तथा ड्यूडी आॅफिसर, लोहमार्ग पोलीस वर्धा.
वर्धा रेल्वे स्थानक परिसरात आढलेली सुमारे चार महिन्यांची मुलगी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात असली असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.
- अनुपम हिवलेकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.