अन् नगराध्यक्षाला ‘गेट आऊट’ म्हणत हाकलले

By admin | Published: July 8, 2017 12:13 AM2017-07-08T00:13:19+5:302017-07-08T00:13:19+5:30

येथील नगराध्यक्ष शीला सोनारे यांचा मुलगा चेतन सोनारे हा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे.

And the town is called 'Get Out' | अन् नगराध्यक्षाला ‘गेट आऊट’ म्हणत हाकलले

अन् नगराध्यक्षाला ‘गेट आऊट’ म्हणत हाकलले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : येथील नगराध्यक्ष शीला सोनारे यांचा मुलगा चेतन सोनारे हा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. नगराध्यक्ष त्याच्या उपचाराबाबत विचारणा करायला गेल्या असता येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांना थेट ‘गेट आऊट’ म्हणून हाकलले. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या उर्मटपणामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत होता.
शिला सोनारे यांच्या मुलाला गॅस्ट्रोची लागण झाल्याने गुरुवारी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर झालेल्या उपचाराबाबत शुक्रवारी सायंकाळी सेवेवर असलेले डॉ. वांदिले यांच्याकडे विचारणा करण्याकरिता सोनारे गेल्या. रुग्णाच्या प्रकृतीबाबत विचारणा सुरू असताना डॉक्टरांनी रुग्णाला त्यांच्या जवळ आणण्याचा सल्ला दिला. यावर नगराध्यक्षांनी त्याला चक्कर येत असल्याचे सांगितले. यातही त्यांनी रुग्णाला डॉक्टराजवळ आणले. डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी करण्याकडे दुर्लक्ष केले. तेव्हा पुन्हा अध्यक्षांनी विनंती केली. यावर डॉक्टरांनी त्यांना थेट ‘गेट आऊट’ म्हणत हाकलून लावत आपल्या उर्मटपणाचा परिचय दिला.
याची माहिती गावात पोहोचताच काही नागरिक संतप्त झाले. या नागरिकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांना पोलिसात देण्याची तंबी दिली. सदर ग्रामीण रुग्णालयावर कुणाचाही वचक नसल्याने रुग्णालयामध्ये असे प्रकार नेहमीचेच आहे. शेवटी लोकप्रतिनिधीलाच या प्रकाराला सामोरे जावे लागल्याने खळबळ निर्माण झाली आहे. सदर बाबीची माहिती आमदार समीर कुणावार यांना दुरध्वनीवरून देण्यात आली. त्यांनी त्वरीत चौकशीचे आदेश दिले आहे.
दवाखान्यात भरती असलेल्या पेशंट व नातेवाईकांनी सुद्धा अनेक तक्रारी केल्या. येथे उपचार घेत असलेल्या भरती सोनु बारई नामक रुग्णाने त्याची व्यथा व्यक्त केली. त्यांना गुरुवारपासून एकच सलाईन लावल्याची माहिती त्यांनी दिली. याची माहिती देण्याकरिता डॉक्टरांकडे गेल्यास ते ओरडतात, असेही त्या म्हणाल्या. हिच कैफियत भरती पेशंट रेखा चाफले, वनिता गुडवार यांनी ऐकविली.

मी वॉर्डमधून पेशंटला घेवून या म्हटले. ते पेशंटला घेवून आले; मात्र त्यावेळस दुसऱ्या पेशंटला तपासत असल्याने वेळ झाला. मी पेशंट ओळखतो, मला नगराध्यक्षाचे काही घेणे देणे नाही.
-डॉ. शैलश वांदिले, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय समुद्रपूर.

Web Title: And the town is called 'Get Out'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.