घालणाऱ्या माकडांच्या टोळ्यामुळे वर्धा जिल्ह्यातील आंजीचे गावकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 11:07 AM2020-04-03T11:07:19+5:302020-04-03T11:08:00+5:30
सध्या सगळे जग कोरोनामुळे त्रस्त असण्याच्या काळात वर्धा जिल्ह्यातल्या आंजीचे नागरिक कोरोनासोबतच माकडांमुळेही हतबुद्ध झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: सध्या सगळे जग कोरोनामुळे त्रस्त असण्याच्या काळात वर्धा जिल्ह्यातल्या आंजीचे नागरिक कोरोनासोबतच माकडांमुळेही हतबुद्ध झाले आहेत. सध्या पिके निघाल्याने माकडांना खायला तिथे काहीच मिळत नाही. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा गावांकडे वळवला आहे. त्यात उन्हाळ्यात बाहेर टाकली जाणारी वाळवणे ही त्यांचे खाद्य ठरते आहे. महिला वर्गाने मोठ्या मेहनतीने पापड, वड्या, कुरडया वाळत घालाव्यात आणि माकडांनी येऊन त्या फस्त कराव्यात हे दृष्य येथे दिसते. ही माकडे दिसायला धिप्पाड असल्याने त्यांना हाकलण्याचीही महिलांना भीती वाटते. यासोबतच ही माकडे कौलारू घरांवरची कौले विस्कळित करत आहेत. या माकडांचा बंदोबस्त केला जावा अशी नागरिकांची मागणी आहे.