संतप्त नागरिंकांची ग्रा.पं.वर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 11:33 PM2017-11-04T23:33:48+5:302017-11-04T23:33:58+5:30
येथील एका चिमुकल्याचा डेंग्यु या आजाराने मृत्यू झाला. तर अन्य एक तरुण रुग्णालयात उपचार घेत आहे. याला गावातील अस्वच्छता जबाबदार असल्याचे म्हणत गावकºयांनी शनिवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा नेत....
लोकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आ.) : येथील एका चिमुकल्याचा डेंग्यु या आजाराने मृत्यू झाला. तर अन्य एक तरुण रुग्णालयात उपचार घेत आहे. याला गावातील अस्वच्छता जबाबदार असल्याचे म्हणत गावकºयांनी शनिवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा नेत सरपंचाच्या राजीनाम्याची मागणी केली.
दोन दिवसांपूर्वी येथील सचिन देवताळे यांचा एकुलत्या एक मुलाचा डेंग्युने मृत्यू झाला. तर पवन भेंडे या तरुण वर्धेच्या रुग्णालयात उपचार घेत आहे. गावात असलेल्या अस्वच्छतेमुळे हा आजार बळावल्याचे म्हणत गावकरी संतप्त झाले. ग्रा.पं.ने नाल्या उपसल्या नाही. उपसरपंचाने रस्त्यावरच शेणाचे ढिगारे टाकले आहे. त्यामुळेच राणा नामक चिमुकल्याचा जीव गेला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रा.पं.वर मोर्चा काढुन निषेध नोंदवत सरपंच उईके यांना चांगलेच धारेवर धरले. या मृत्यू प्रकरणी सरपंच व सचिवावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.