पशुपालक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 11:22 PM2018-07-30T23:22:42+5:302018-07-30T23:23:14+5:30

अंतोरा परिसरातील आठ गावांमध्ये पावसामुळे जनावरांना घटसर्प आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. पशुसंवर्धन दवाखानात डॉक्टर नसल्याने खाजगी महागडा उपचार करून शेतकरी वैतागले आहे. पशुसंवर्धन विभागाने तात्काळ लसीकरण व उपचार मोफत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

In the animal husbandry crisis | पशुपालक संकटात

पशुपालक संकटात

Next
ठळक मुद्देआठ गावातील : जनावरांना घटसर्प आजाराची लागण
<p>लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : अंतोरा परिसरातील आठ गावांमध्ये पावसामुळे जनावरांना घटसर्प आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. पशुसंवर्धन दवाखानात डॉक्टर नसल्याने खाजगी महागडा उपचार करून शेतकरी वैतागले आहे. पशुसंवर्धन विभागाने तात्काळ लसीकरण व उपचार मोफत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मागील पंधरा दिवसापासून रिपरिप पाऊस झाला. पावसाळ्यातील दूषित पाणी किडीने भरलेला चार जनावरांच्या खाण्यात गेला. त्याचा परिणाम जनावरांच्या आजारावर झाला. त्यातच घटसर्प या जीवघेण्या आजाराची लागण झाल्याने मोठ्या प्रमाणात जनावरे घरीच गोठ्यात बांधून ठेवावी लागत आहे. अंतोरा, नवीन अंतोरा, माणिकनगर, बेलोरा, खंबीत, देलवाडी, जोलवाडी, चिंचोली या गावातील पशुंसाठी अंतोरा येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे. मात्र येथे गेल्या ३ महिन्यांपासून पशुधन अधिकारी नाही. त्यामुळे अतिरिक्त कारभार भारसवाडा येथील अधिकाºयाकडे आहे. त्यांच्याकडे आधीच जास्त काम असल्याने अंतोराकडे येण्यास वेळ नसल्याची माहिती मिळाली आहे.
शेतकरी दवाखान्यात येरझारा मारून शकले आहे. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी.एन. काळे यांचीही बुलढाणा जिल्ह्यात अचानक बदली झाली. त्यांच्या जागेवर डॉ. कांबळे रूजू झाल्या. मात्र त्यांनी पशुवैद्यकीय केंद्राकडे पाहिजे तसे लक्ष दिले नाही. त्यामुळे समस्या गंभीर बनत चाचली आहे. शेतकºयांच्या संकटाची दखल घेण्यात आली नसल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे.
राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने जनावरांच्या आजाराच्या औषधीची खरेदी राज्य स्तरावरच केली नाही. त्यामुळे स्थानिक पशु वैद्यकीय दवाखान्यांमध्ये औषध उपलब्ध नाही. शासकीय दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी नियमितपणे सेवा देत नाही. एका पशुवैद्यकीय अधिकाºयाकडे दोन ते तीन गावांचा पदभार आहेत. त्यामुळे ते वेगवेगळ्या दिवशी उपलब्ध होतात त्यामुळे पशुपालकाच्या अडचणी वाढत आहे. तर काही पशुवैद्यकीय अधिकारी खासगी व्यवसायही करतात त्यामुळे त्यांचे प्राधान्य दुसरीकडेच राहते. असे दिसून येते.

दोन हजार जनावरे आजाराच्या विळख्यात
घटसर्पाच्या लागणीमुळे आठ गावातील दोन हजारावर जनावर आजारी आहे. त्यांना धड उभेही राहता येत नाही. अनेक गायी, बैल, कालवड, गोºहे आजारामुळे दगावण्याच्या स्थितीत आहे. त्यांना तात्काळ लसीकरण करण्याची गरज आहे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकाºयांनी दखल घेण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. पावसाळ्यापूर्वी नियोजन करण्यात आले नाही.

Web Title: In the animal husbandry crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.