कृषी महोत्सवापाठोपाठ पशु प्रदर्शनाचा ‘फ्लॉप शो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 05:00 AM2020-02-09T05:00:00+5:302020-02-09T05:00:23+5:30

पशुसंवर्धन विभागामार्फत वायगाव (निपाणी) येथे देवळी मार्गालगतच्या सिंघानिया ले-आउटमध्ये आयोजित या पशुप्रदर्शनाकरिता जिल्हा नियोजनसमितीमधून ५ लाख इतकी भरीव तरतूद करण्यात आली होती. मात्र, आयोजकांनी प्रदर्शनाविषयी प्रभावी जनजागृती करण्यात काही कारणास्तव प्रचंड निरुत्साह दाखविला.

Animal show 'flop show' after agricultural festival | कृषी महोत्सवापाठोपाठ पशु प्रदर्शनाचा ‘फ्लॉप शो’

कृषी महोत्सवापाठोपाठ पशु प्रदर्शनाचा ‘फ्लॉप शो’

Next
ठळक मुद्देवायगाव (नि.) येथील आयोजन । अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पशुसंवर्धनातून रोजगारनिर्मिती, पर्यायाने शेतकऱ्यांचा पशुपालनाकडे कल वाढावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे याकरिता जिल्हा परिषद, पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वायगाव (निपाणी) येथे पशु प्रदर्शनाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. मात्र, अधिकाºयांचे ढिसाळ नियोजन, शेतकरी, पशुपालकांचा अत्यल्प प्रतिसाद आणि लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याने हे पशुप्रदर्शन ‘फ्लॉप’ ठरले.
पशुसंवर्धन विभागामार्फत वायगाव (निपाणी) येथे देवळी मार्गालगतच्या सिंघानिया ले-आउटमध्ये आयोजित या पशुप्रदर्शनाकरिता जिल्हा नियोजनसमितीमधून ५ लाख इतकी भरीव तरतूद करण्यात आली होती. मात्र, आयोजकांनी प्रदर्शनाविषयी प्रभावी जनजागृती करण्यात काही कारणास्तव प्रचंड निरुत्साह दाखविला. त्यामुळे पशुंची नोंदणीही अत्यंत कमी झाली. ढिसाळ नियोजनाची कुणकुण लागली म्हणावी की काय खुद्द खासदार, आमदार एवढेच नव्हे तर जिल्हा परिषद अध्यक्षांनीदेखील ‘भव्य’ असे नामाभिधान केलेल्या या पशुप्रदर्शनाकडे पाठ फिरविली. निधीची पुरेशी तरतूद असतानाही प्रदर्शनस्थळी सोयी-सुविधांचाही प्रचंड दुष्काळ होता. त्यामुळे पशुपालक आणि शेतकऱ्यांचा मोठा हिरमोड झाला. अनेकांनी या ‘भव्य’ आयोजनाविषयी संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्या. नियोजनाच्या अभावामुळे दुपारनंतरच प्रदर्शनस्थळी वैरणटंचाई निर्माण झाल्याने शेतकरी पशुपालकांची मोठी धावपळ झाली. जनावरांना याचा फटका बसला.
उत्कृष्ट जनावरे निवडीची प्रक्रिया जिल्ह्याबाहेरील तज्ज्ञ अधिकाºयांमार्फत होणे गरजेचे आहे. तसा नियमदेखील आहे. या प्रक्रियेकरिता केवळ एका अधिकाºयाने हजेरी दर्शविली.
त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाºयांमार्फत निवड प्रक्रियेचे सोपस्कार पार पाडण्यात आले. प्रदर्शनाकरिता बोटावर मोजण्याइतकेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यामुळे आयोजक अधिकाऱ्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असमन्वयाचाही प्रत्यय आला. कार्यक्रमाच्या संचालनात पशुधन विकास अधिकारी डॉ. अश्विन मेश्राम यांनी सन्माननीय पाहुण्यांचा चक्क एकेरी शब्दात नामोल्लेख केला. यात समाजकल्याण सभापती, कृषी व पशुसंवर्धन सभापती यांचा समावेश होता.
हा विषयही प्रदर्शनस्थळी चर्चेचा विषय ठरला. आयोजनात नियोजनाचा पदोपदी अभाव असल्याने हे पशुप्रदर्शन ‘फ्लॉप शो’ ठरले. शासनाने या आयोजनावर केलेला खर्चही व्यर्थ ठरल्याचेच अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.

जनावरे वाहतुकीसाठी तोकडी तरतूद
पशुपालकांनी आपली जनावरे प्रदर्शनात सहभागी करावी याकरिता वाहतूक खर्च दिला जातो. मात्र, प्रतिजनावरे केवळ ३०० रुपये इतकी तोकडी तरतूद करण्यात आली. परिणामी अनेकांना अनावश्यक भुर्दंड सोसावा लागला. यात अधिकाºयांनी मोठे ‘अर्थ’कारण केल्याचा आरोपही पशुपालक आणि शेतकऱ्यांनी केला.


जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी
पशु प्रदर्शनाच्या आयोजनाकरिता जिल्हा नियोजन समितीतून पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. एवढी भरीव तरतूद असतानाही अधिकाऱ्यांनी ‘पुअर शो’ केला. पशुपालक, शेतकºयांना आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या प्रदर्शनावर झालेल्या खर्चाचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला द्यावे, अशी मागणीही होत आहे.

पैसा गेला तरी कुठे?
पशुप्रदर्शनाच्या आयोजनाकरिता जिल्हा नियोजन समितीतून ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. असे असतानाही प्रदर्शनस्थळी सोयी-सुविधांचा प्रचंड अभाव होता. निधी खर्चच करण्यात आला नसल्याचा आरोप शेतकरी-पशुपालकांनी केला. खर्च करताना संबंधित अधिकाऱ्यांना हात आखडता का घेतला, असावा याविषयीही चर्चेला पेव फुटले होते. एकूणच अधिकाºयांच्या उदासीनतेचा पशुपालक शेतकºयांना फटका बसला. आयोजनाची चौकशी करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

Web Title: Animal show 'flop show' after agricultural festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.