सेवाग्रामचा अण्णासागर तलाव अजूनही कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 10:20 PM2017-08-31T22:20:59+5:302017-08-31T22:21:23+5:30

गत दोन दिवस पिकांना संजीवनी देणाराच पाऊस झाला. पण, नदी, नाले अद्यापही दुथडी भरून वाहेल असा पाऊस न झाल्याने या भागातील अण्णासागर तलाव कोरडाच आहे.

The Annasagar lake of Sevagram is still dry | सेवाग्रामचा अण्णासागर तलाव अजूनही कोरडाच

सेवाग्रामचा अण्णासागर तलाव अजूनही कोरडाच

Next
ठळक मुद्देलाडक्या बाप्पाला पावसासाठी साकडे : दमदार पावसाची शेतकºयांसह नागरिकांना प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : गत दोन दिवस पिकांना संजीवनी देणाराच पाऊस झाला. पण, नदी, नाले अद्यापही दुथडी भरून वाहेल असा पाऊस न झाल्याने या भागातील अण्णासागर तलाव कोरडाच आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने पाहिजे तशी विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली नसल्याचे बोलल्या जात असून दमदार पावसासाठी बाप्पाकडे शेतकरी व नागरिक साकडे घालीत आहे.
गणरायाच्या आगमनानंतर गावासह परिसरात दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. यंदा सुरूवातीला पाऊस न झाल्याने संपूर्ण गणेशोत्सवादरम्यान पावसाची झड राहील असा अंदाज नागरिकांना होता. झालेल्या पावसामुळे शेतात उभी असलेल्या विविध पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पण, नदी व नाले दुथडी भरून वाहेल असा पाऊस न झाल्याने अनेक तलावांमध्ये पाहिजे तसा पाणीसाठा गोळा झालेला नसल्याचे वास्तव आहे. गेल्या दोन दिवसाच्या पावसामुळे पिकांना संजिवनी मिळाली असली तरी पुढे समाधानकारक पाऊस न झाल्यास नागरिकांना जल संकटाला सामोरे जावे लागणार आहे. दररोज सायंकाळच्या सुमारास आकाशात ढग गर्दी करीत असले तरी बरसत नसल्याने नागरिकांसह शेतकरी आपल्या लाडक्या बाप्पा चरणी वरुण राजाला बरसण्याची सूचना दे असे साकडेच घालत आहे. सध्याच्या ढगाळी वातावरणाचा कपाशी, सोयाबीन, तुर आदी पिकांवर विपरीत परिणाम होत असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. शेताततून पाण्याचा लोट निघाले व नदी व नाले दुथडी भरून वाहेल अशा पावसाची तसेच विहिरीत पाणी समाधानकारक वाढण्याची आणि गावासाठी महत्त्वाचा असलेल्या अण्णासागर तलाव भरण्याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.
ढगाळी वातावरणाने शेतकºयांची वाढविली चिंता
गत दोन दिवस झालेल्या पावसानंतर दररोज सायंकाळी आकाशात काळे ढग गर्दी करीत आहेत. परंतु, ते बरसत नसल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. सध्याच्या ढगाळी वातावरणाचा तुर, कपाशी, सोयाबीन व भाजीपाला उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे शेतकरी सांगतात. त्यातच अळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने गावातील शेतकºयांसह परिसरातील शेतकºयांची चिंता वाढली आहे.
 

Web Title: The Annasagar lake of Sevagram is still dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.