अण्णासागर जलाशयात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 10:22 PM2019-04-21T22:22:37+5:302019-04-21T22:23:06+5:30

सौंदर्य व जलसाठा वाढावा तसेच शेतजमीन ओलिताखाली यावी या उद्देशाने राज्य शासनाच्यावतीने येथील वर्धा मार्गावर गाव तलावाचे पुनर्जीवन करण्यात आले. या अण्णासागर जलाशयाच्या कामासाठी ६५.६५ लाखांचा निधीही खर्च करण्यात आला.

Annasagar Water Resource | अण्णासागर जलाशयात ठणठणाट

अण्णासागर जलाशयात ठणठणाट

Next
ठळक मुद्देसेवाग्रामात पाणीबाणी : मत्स्य पालनालाही मूठमाती

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : सौंदर्य व जलसाठा वाढावा तसेच शेतजमीन ओलिताखाली यावी या उद्देशाने राज्य शासनाच्यावतीने येथील वर्धा मार्गावर गाव तलावाचे पुनर्जीवन करण्यात आले. या अण्णासागर जलाशयाच्या कामासाठी ६५.६५ लाखांचा निधीही खर्च करण्यात आला. मात्र, सदर अण्णासागर जलाशयात सध्या पाण्याचा ठणठणाट आहे. परिणामी, सेवाग्राम येथे जलसंकट तीव्र झाले असून मत्स्य पालनाही मुठमाती मिळाल आहे.
जि. प. लघुसिंचन विभाग वर्धा तर्फे महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमीसंधारण अभियानांतर्गत अण्णासागर तलावाचे नव्याने पुनर्जीवन करून १२०.८८ सघमी इतका जलसाठ्याची साठवणू करता येईल, अशा पद्धतीने काम करण्यात आले. हा जलाशय सेवाग्राम-वर्धा मार्गावर असल्याने व महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुढे असल्याने यामुळे परिसरातील सौंदर्यात भरच पडणार होती. परंतु, सध्या या जलाशयात एक थेंबही पाणी नाही. सर्व सेवा संघाच्या जागेवर असलेल्या या जलाशयाचा एक बंधारा आदर्शनगरकडून बनविण्यात आला आहे.
यामुळे चार ठिकाणावरून वाहणारे पाणी सरळ तलावात येईल. शिवाय यातून जलसाठा वाढेल अशी आशा होती. मात्र, सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम या जलाशयाच्या पाणी साठवणीवर झाला. त्यातच सध्या या जलाशयात पाण्याचा ठणठणाट आहे. या जलाशयात मत्स्य पालन उपक्रम सुरू करण्यात आला होता. परंतु, पाण्याअभावी तोही बारगळला आहे. असे असले तरी यंदाच्या पावसाळ्यात जोरदार पाऊस होत हा जलाशय पूर्णपणे भरेल अशी आशा नागरिकांना आहे.

Web Title: Annasagar Water Resource

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.