स्वच्छता अभियानात नेरी मिर्झापूर जिल्ह्यात दुसरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 09:23 PM2018-08-16T21:23:26+5:302018-08-16T21:25:16+5:30
संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१७ -१८ चे पुरस्कार स्वातंत्र्यदिनी जाहीर करण्यात आले. यामध्ये आर्वी पंचायत समिती अंतर्गत असलेले नेरी मिझार्पूर गावाला जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१७ -१८ चे पुरस्कार स्वातंत्र्यदिनी जाहीर करण्यात आले. यामध्ये आर्वी पंचायत समिती अंतर्गत असलेले नेरी मिझार्पूर गावाला जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या हस्ते सरपंच पदमा मुन्द्रे, उपसरपंच बाळा सोनटक्के, ग्रामसेवक राजू शेंद्रे यांनी स्विकारला.
आर्वी तालुक्यातील नेरी मिझार्पुर या गावाने नवनवीन प्रयोग तथा उपक्रम राबवून गावाचा सर्वांगीण विकास केला आहे. गाव निरोगी राहण्यासाठी गावाची स्वच्छता करणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून गावात २०१७ मध्ये जून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत विविध स्वच्छता विषयी यशस्वी उपक्रम राबविणयात आले. रोगराई विरूद्ध यशस्वी लढा गावकºयांच्या सहकार्याने पूर्ण केला.
१ ते १५ जून दरम्यान ग्रामसभा व ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समितीची बैठक घेऊन स्वच्छता अभियान राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. यात गावातील शौचालय निर्मिती तथा संपूर्ण गावातील स्वच्छतेचा आराखडा तयार करून आराखड्या प्रमाणे स्वच्छता विषयक कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली.
१ आॅक्टोबर रोजी महिला ग्रामसभा आयोजित करून कुटुंबाची, घराची तथा परिसराची स्वच्छता करण्याबाबत महिलांचा सहभाग वाढविला. यातूनच स्वच्छता विषयी जन जागृती, ग्राम सफाई, कचरा मुक्ती अभियान यशस्वी झाले. वैयक्तिक स्वच्छता जागृती मध्ये नखे काढणे, स्वच्छ आंघोळ करणे, केस धुणे, उवा निर्मुलन मोहीम तथा घर, परिसरातील स्वच्छता, सजावट मोहीम घेण्यात आली. त्याच प्रमाणे हात धुवा मोहीम प्रात्यक्षिक दाखवून गावकºयांना, शाळेतील विद्यार्थ्यांना, पालकांना हात धुण्याचे महत्त्व समजविण्यात आले.
श्रमदानातून गाव स्वच्छता सफाई मोहीम तसेच आदर्श गोठा करण्यात आले. पाणी शुद्धता, गटार व्यवस्थापन तसेच गावातील नागरीकांन साठी स्वच्छता स्लोगन स्पर्धा आयोजित करण्यात आली. गावातील संपुर्ण घरावर महीलांच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या. यातूनच आदर्श माता, स्वच्छ घरे, स्वच्छ वर्ग शाळा, स्वच्छ गोठा, स्वच्छ गल्ली, स्वच्छ वस्ती, उत्कृष्ट पाणी साठवण याबाबतीत नेरी मिझार्पुर अग्र क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे ग्रामसचिव, सदस्य व गावकरी यांच्या सहकार्यातून मिझार्पूरमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहे.