खाद्य तेल, डाळींवरही आयात शुल्क लागू करा
By admin | Published: June 25, 2014 11:55 PM2014-06-25T23:55:32+5:302014-06-25T23:55:32+5:30
केंद्र शासनाने साखरेच्या आयातीवर ४० टक्के आयात कर लावण्याचा निर्णय घेतला आहे़ या निर्णयामुळे साखरेच्या भावात ४० रुपये प्रती किलोच्या जवळपास झाले आहेत़ हा निर्णय स्वागतार्ह असून केंद्र
वर्धा : केंद्र शासनाने साखरेच्या आयातीवर ४० टक्के आयात कर लावण्याचा निर्णय घेतला आहे़ या निर्णयामुळे साखरेच्या भावात ४० रुपये प्रती किलोच्या जवळपास झाले आहेत़ हा निर्णय स्वागतार्ह असून केंद्र शासनाने खाद्य ते आणि डाळींच्या आयातीवरही आयात शुल्क लागू करावे, अशी मागणी शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केली आहे़ याबाबत त्यांनी अन्नमंत्री रामविलास पासवान यांना पत्रही पाठविले आहे़
केंद्र शासनाने साखरेवर ४० टक्के आयात कर लागू करण्याचा निर्णध घेतल्याने देशातील कमी होणारे साखरेचे भाव स्थिर झाले़ यात साखर उत्पादकांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे़ हा निर्णय तेल बिया आणि डाळींचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांकरिता का लागू केला जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ सध्या देशातील ५० टक्के आवश्यक खाद्य तेल आयात केले जात आहे़ ३० लाख टन डाळीही आयात केल्या जात आहेत़ शेंगदाणा, चणा, तुरी या शेतमालाला समर्थन मूल्यही बाजारात मिळत आहे़ या पार्श्वभूमीवर खाद्य तेल आणि डाळींवरही साखरेप्रमाणे आयात कर लागू करण्याची घोषणा करावी़ तसेच निर्यात बंदी हटविण्यात यावी़ ही मागणी २००८ पासून केली जात आहे़ याबाबत डॉ़ मनमोहनसिंग यांचे सरकार असतानाही पत्र व्यवहार करण्यात आला; पण कुठलीही कारवाई झाली नाही़ अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी या मागणीकडे लक्ष देत खाद्य तेल व डाळींवर आयात कर लागू करण्याची मागणीही जावंधिया यांनी पत्रातून केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)