अधिकाऱ्यांची नियोजनशून्यता; तालुक्यात जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 11:39 PM2018-11-29T23:39:35+5:302018-11-29T23:39:57+5:30

कारंजा तालुक्यात एकमेव खैरी जलाशय असून या जलाशयात सध्या २६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. असे असतानाही सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेमुळे ५० हून अधिक अनधिकृत मोटरपंपव्दारे पाणी उपसा सुरु आहे.

Appointment of officers; Water conservation in the taluka | अधिकाऱ्यांची नियोजनशून्यता; तालुक्यात जलसंकट

अधिकाऱ्यांची नियोजनशून्यता; तालुक्यात जलसंकट

Next
ठळक मुद्देअनधिकृत मोटरपंपाचा भार : नारा- २२ व कारंजा येथील पाणीपुरवठा योजनेचे भवितव्य धोक्यात

अरुण फाळके।
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : कारंजा तालुक्यात एकमेव खैरी जलाशय असून या जलाशयात सध्या २६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. असे असतानाही सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेमुळे ५० हून अधिक अनधिकृत मोटरपंपव्दारे पाणी उपसा सुरु आहे. हा उपसा असाच सुरु राहिला तर फेब्रुवारी व मार्च महिन्यातच कारंजावासींयांच्या घशाला कोरड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यात कारंजाचा समावेश असल्याने संभावीत पाणी टंचाई लक्षात घेता ३० आॅक्टोबरला संबंधित विभागाची बैठक पार पडली. या बैठकीला जलाशयाचे अधिकारी, तहसीलदार व वीज वितरणचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी या जलाशयावर ५० हून अधिक मोटरपंप अनधिकृतरित्या सूरू असून त्यांच्यावर कारवाईकरीत ते बंद केले जाईल, असे आश्वासन या बैठकीत दिले होते. पण, अधिकाऱ्यांची ही आश्वासने कु ठे गडप झाली हे कळायला मार्ग नाही.
पाणी कमी असताना धरणाच्या पश्चिमेकडील कालवा खुला करुन पाणी सोडण्यात आले. जी गावे प्रत्यक्ष धरणात गेली त्या खैरी व इतर गावांना हिवाळी पीकांची लागवड करु नका. पाणी दिल्या जाणार नाही असे सांगण्यात आले होते. पिण्याच्या पाण्याचे भविष्यकालीन संकट लक्षात घेता, येथील काही गावांनी हिवाळी पिकांची लागवड केली नाहीत. पण इतर दूरच्या गावांना मात्र कालव्याव्दारे पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचा प्रताप, संबंधित अधिकाºयांनी केल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे.
कालव्याचे पाणी सोडल्यामुळे जलाशयावर अवलंबून असणाºया नारा-२२ गावाची पाणीपुरवठा योजना आणि कारंजा शहराची पाणी पुरवठा योजना मार्चमध्ये बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या कालव्याव्दारे पाणी सोडल्या गेले तो कालवा फुटल्याने पाणी इतरत्र पसरुन वाया जात आहे. दुष्काळी परिस्थिती हा पाण्याचा अपव्यय चिंतेचा विषय ठरत आहे.
जलाशय ठरले शेतकऱ्यांसाठी वरदान
येथील खैरी धरण माती व सिमेंटचे असून या धरणाचे पाणलोट क्षेत्र १७६.१२ चौ.मी.मीटर आहे. धरणाची उंची २५.११ मीटर असून लांबी ८२७ मीटर आहे. तसेच पाणी साठवणूक क्षमता २६ दशलक्ष घनमीटर असून यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे धरण भरले नाही. नेहमी ओव्हर फ्लो होणारे धरण यावर्षी केवळ ६० टक्केच भरले. या धरणामुळे आष्टी तालुक्याच्या १४ गावांतील ३ हजार ६९० हेक्टर व कारंजा तालुक्याच्या १३ गावांतील १ हजार ५०० हेक्टर जमिनीला सिंचनाखाली आणले. सध्या २६ टक्केच जलसाठा आहे.

Web Title: Appointment of officers; Water conservation in the taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.