ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याबाबत मंजुरी
By admin | Published: December 28, 2016 01:08 AM2016-12-28T01:08:28+5:302016-12-28T01:08:28+5:30
राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याबाबत एकमताने मंजुरी दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रामदास तडस : राज्य शासनाने नववर्षाची दिलेली भेट
वर्धा : राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याबाबत एकमताने मंजुरी दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील ओबीसी समाजाला नवर्षाची आगळीवेगळी भेट दिल्याचे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष या नात्याने गेली अनेक वर्षे समाजाची सेवा करण्याचे भाग्य लाभले. अनेक वर्षापासूनची ओबीसींच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी होती. यापूर्वी अनेक सरकार येऊन गेली; परंतु स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापनेबाबत या बहुप्रलंबित मागणीकडे कोणत्याही सरकारने विशेष लक्ष दिले नाही; परंतु भारतीय जनता पक्षाच्या या सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या बहु प्रलंबित मागणीला मान्यता देऊन फार मोठे पाऊल उचलेले आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजातील अनेक घटकांना वेगळे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यामुळे ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न जलद गतीने मार्गी लागण्यास मदत होईल व पर्यायाने समाज व शासन यांच्यातील दुवा म्हणून हे नवीन मंत्रालय कार्य करील. राज्य शासनाच्या या निर्णयाबद्दल महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने खासदार रामदास तडस यांनी आभार व्यक्त केले. असून राज्यशासन ओबीसी मंत्रालय जनतेच्या सेवेत लवकरच कार्यान्वित होईल, असा विश्वास देखील व्यक्त केला.(प्रतिनिधी)