सेवाग्राम रेल्वे स्थानकावर आॅटोचालकांची मनमानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:04 PM2018-10-15T22:04:06+5:302018-10-15T22:04:30+5:30
शहरालगत असलेल्या सेवाग्राम रेल्वे स्थानकावर आॅटोचालकांची मनमानी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे बाहेर राज्यातून येणाऱ्या व शहरातील नागरिक, प्रवासी यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रेल्वे स्थानकावर शासनाने प्रीपेड आॅटोरिक्षा सर्व्हिस सुरू करून आॅटोचालकांच्या मनमानीला लगाम लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरालगत असलेल्या सेवाग्राम रेल्वे स्थानकावर आॅटोचालकांची मनमानी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे बाहेर राज्यातून येणाऱ्या व शहरातील नागरिक, प्रवासी यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रेल्वे स्थानकावर शासनाने प्रीपेड आॅटोरिक्षा सर्व्हिस सुरू करून आॅटोचालकांच्या मनमानीला लगाम लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सेवाग्राम रेल्वे स्थानक वर्धा शहराच्या बाहेर भागात आहे. या भागात सायंकाळनंतर फारशी वर्दळ राहत नाही. शिवाय दिवसाही रेल्वे गाड्यांच्याच वेळेत येथे वर्दळ दिसून येते. या रेल्वे स्थानकावर मध्य व दक्षीण भारतातून येणाºया अनेक रेल्वे गाड्या थांबतात. दरररोज साधारणत: २० ते २५ गाड्यांना येथे थांबा आहे. देश-विदेशातून येणारे अनेक पर्यटक सेवाग्रामसाठी येथेच उतरतात. येथील आॅटोचालक अतिशय मग्रुर असून त्यांची मनमानी चालली आहे. दीडशे ते दोनशे रूपयाच्या कमी भाडे ते घेतच नाही. या ठिकाणी आॅटोशिवाय दुसरी व्यवस्था नसल्याने व आॅटोचालक एकत्रिरित्या प्रवाश्यांना लुटण्याचे काम करीत असल्याने नाईलाजास्तव प्रवाशांना आॅटोचालकांचा सहन करावे लागते. येथील आॅटोचालक दिवसभर येथे पत्ते पिसत राहतात. गाडी आले की प्रवाशांच्या वयाचेही भान न ठेवता त्यांच्यासोबत भावबाजीवरून वाद घालत असतात. ज्येष्ठ नागरिक, प्रवाशी यामुळे त्रस्त झाले आहे.रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होते आहे. त्यामुळे आॅटोचालकांची मनमानी वाढली आहे.
चोकोलिंगम जिल्हाधिकारी असताना निश्चित केले होते दर
या रेल्वे स्थानकावर रात्री बेरात्री रेल्वे गाड्या येतात. प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर लुट आॅटोरिक्षा चालक करिता असतात. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. चोकोलिंगम वर्धेचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी या रेल्वे स्थानकावरील आॅटोरिक्षा स्टॅँडवर उभ्या राहणाऱ्या आॅटोचे विविध ठिकाणचे दर निश्चित करून दिले होते. यापेक्षा अधिक पैसे घेणाºयांवर कारवाईचा दणकाही दिला होता. त्यामुळे प्रवाशांची लूट थांबली होती. परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे मनमानी सुरू आहे.
वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
शहराच्या अनेक चौकांमध्ये वाहनचालकांना पकडण्यासाठी सक्रिय राहणारे वाहतुक पोलीस सेवाग्राम रेल्वे स्थानकाच्या भागात भटकतानाही दिसत नाही. येथे वाहतुक पोलीस नसल्याने आॅटो चालकांचेच राज्य आहे. त्यांनी मनमानी दर आकारणी सुरू केली आहे. महिला प्रवाशांनाही घाणेरड्या भाषेत हे आॅटोचालक शिवीगाळ करतात. येथे वाहतुक पोलीस तैनात करून आॅटोचालकांची मनमानी थांबविण्याची गरज आहे.
प्रीपेड आॅटो केंद्र सुरू करा
नागपूरसह देशाच्या विविध मोठ्या रेल्वे स्थानकावर प्रीपेड आॅटोरिक्षा स्टॅन्ड चालविले जाते. सेवाग्राम रेल्वे स्थानकावर प्रवाशांची होणारी लूट थांबविण्यासाठी रेल्वे प्रशासन व जिल्हा प्रशासनाने प्रीपेड आॅटोरिक्षा स्टॅन्ड सुरू करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशी मित्र मंडळाने केली आहे. येथून सीट प्रमाणे बस स्टॅन्डसाठी आॅटोरिक्षा सोडले जातात. त्या आॅटोत किमान दहा ते पंधराच्यावर प्रवाशी बसविले जातात व त्यांच्यासोबतही मनमानी केली जाते. येथील आॅटोचालकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आहे.