आठवडी बाजारात कर वसूल करणाऱ्या ठेकेदाराची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:17 AM2018-04-22T00:17:33+5:302018-04-22T00:17:33+5:30

येथील नगरपंचायतीने दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारातील दुकानदाराकडून कर वसूल करण्याचा वार्षिक ठेका एका कंत्राटदाराला दिला. त्याला प्रत्येक दुकानदाराकडून किती रक्कम घ्यायची हे निर्धारित असताना लहान-मोठ्या दुकानदाराकडून ठेकेदार दादागिरी करीत मनमानी वसुली करीत असल्याचा आरोप आहे.

The arbitrator's contract with the tax collector in the market for the week | आठवडी बाजारात कर वसूल करणाऱ्या ठेकेदाराची मनमानी

आठवडी बाजारात कर वसूल करणाऱ्या ठेकेदाराची मनमानी

Next
ठळक मुद्देदुकानदार त्रस्त : मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : येथील नगरपंचायतीने दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारातील दुकानदाराकडून कर वसूल करण्याचा वार्षिक ठेका एका कंत्राटदाराला दिला. त्याला प्रत्येक दुकानदाराकडून किती रक्कम घ्यायची हे निर्धारित असताना लहान-मोठ्या दुकानदाराकडून ठेकेदार दादागिरी करीत मनमानी वसुली करीत असल्याचा आरोप आहे. याला आवर घालण्यासाठी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना दुकानदारांच्या शिष्ट मंडळाने निवेदन दिले.
या निवेदनात दुकानदाराकडून चार ते पाच पट अधिक रक्कम दडपशाहीचा वापर करीत ठेकेदार व त्यांची माणसे वसुल करतात. त्याची पावती देत नाही, असा आरोप करण्यात आला आहे. नगरपंचायतीने दुकानदाराकडून नेमकी किती रक्कम पावतीबाबत द्यायची याच्या स्पष्टीकरणाची मागणी केली. या ठेकेदाराच्या अरेरावीला दुकानदार वैतागले असून त्यांनी संताप व्यक्त केला.
यावेळी मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी न्याय देण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. निवेदन देताना निलेश गावंडे, आकाश फाटे, अमोल मानकर, राहुल ठाकरे, राजू फाटे, नानाजी लाखे, अजय फाटे, हरी चंदनसे,किशोर साठे, अवी ठाकरे, जयराम नौकरकर आदि भाजी विक्रेत्या दुकानदारांनी स्वाक्षरीचे निवेदन दिले. भाजी विक्रेत्यासह सर्व दुकान दारांनी न्यायाची मागणी केली आहे.

Web Title: The arbitrator's contract with the tax collector in the market for the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.